आई-बाबा होणे ही आयुष्यातील सर्वात आनंददायी गोष्ट असते. पण ही एक महत्त्वाची जवाबदारी देखील आहे. मुले कितीही मोठे झाले तरी आई-वडीलांची जवाबदारी संपत नसते. आपल्या मुलाला काय चुकीचे काय योग्य याचे संस्कार त्याच्यावर होणे गरजेचे असते. तो एक उत्तम जागरुक नागरिक व्हावा यासाठी पालक म्हातारपणापर्यंत मार्गदर्शन करत असतात. हे सगळे आपल्या मुलांना सांगण्याचा शिकवण्याचा एकच हेतू असतो की त्याने आयुष्यात चांगल्या गोष्टी शिकाव्या मोठ्यांचा आदर करावा. तुमचा देखील हाच उद्देश असेल. त्यासाठीच आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला एक उत्तम पालक होण्यास मदत होईल.
1. रागावर नियंत्रण ठेवा
नेहमी एक लक्षात ठेवा मुलांना चुक केल्यावर त्यांच्यावर रागवू नका. चुकांमधून काय चुक आणि काय बरोबर याची माहिती द्या. यामुळे त्यांना चुक आणि बरोबर याची माहिती होईल. त्यामुळे त्यांच्या चुकांवर रागवण्यापेक्षा हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा की नेमके त्यांने का चुक केली आहे. यामुळे पुन्हा दुस-यांदा तो ती चुक पुन्हा करणार नाही. छोट्या-छोट्या चुकांबद्दल रागवण्या ऐवजी त्याला प्रेमाने समजावून सांगा.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या उत्तर आई-बाबा बनण्यासाठी अजून कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या...