( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एखाद्या गोड पदार्थाला मुग्यांची लाईन लागलेली असते. तसेच हवामान बदलले की घरामध्ये मच्छर, माश्या आणि मुंग्या परेशान करून सोडतात. आज आम्ही तुम्हाला घरात लागणा-या किडे आणि कोळींपासून मुक्तता मिळण्यासाठी काही टिप्स सांगत आहोत.
1- तुळशीचा वास आहे असरदार
तुमच्या घरातील किचन आणि खिडक्यांमध्ये तुळशीचे झाड लावा, तुळशीच्या झाडाच्या वासामुळे घरामध्ये किडे प्रवेश करत नाही. तुम्हाला जर झाड लावणे शक्य नसल्यस तुम्ही एखाद्या पाकिटात तुळशीचे सुकलेली पाने ठेवून ते पाकिट जेथे किडे लागले आहेत तेथे ठेवले तर किडे कमी होण्यास सुरूवात होईल.
2- कॅटनिपचे झाड लावा (CATNIP)
घरातील आतील बाजूला लागणारे किडे आणि कोळी घालवण्यासाठी तुम्ही गार्डन आणि किचनच्या खिडकीवर कॅटनिपचे झाड लावू शकता. तुमच्या घरामध्ये जर खुप मच्छर झाले असतील तर तुम्ही ते चाऊ नये यासाठी कॅटनिपचे तेल लावून झोपू शकता.