आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वजन कमी करायचे आहे ना, असा असावा तुमचा आहार...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज बदलेल्या लाइफस्टाइलमुले लठ्ठपणाची समस्या सर्वांना जाणवत आहे. अशा वेळी सर्व लोक वेगवेगळे सल्ले देत असतात. डायटिंग करण्याच्या देखिल अनेक पध्दती आहेत. डिटॉक्स डाएट, व्हेजिटेरियन डाएट, लो-फॅट डाएट असे अनेक प्रकार यामध्ये आहेत, पण त्यापासून फायदे किती होतात, हे निश्चित सांगता येत नाही. कारण काहींना ते मानवतात, तर काहींना नाही. मानवली तरी काही काळानंतर त्याचा प्रभाव कमी होताना दिसतो. त्यामुळे कोणत्या आहाराचा नेमका परिणाम काय होतो ते माहीत असणे आवश्यक आहे. आपल्याला उपयोगी सात आहाराबाबतची माहिती आपण पाहणार आहोत. चला तर मग पाहुया हे 7 आहार कोणते...
1. पानकोबीचे सूप
एका आठवड्यातच तब्बल 4.5 किलो वजन कमी करायचे असेल तर हे डाएट तुम्ही अवलंबू शकता. या आठवड्यात तुम्ही फक्त कोबी (कॅबेज) सूपच आहारात घ्यायला पाहिजे.
किती खावे : शक्य होईल तितके सूप सेवन करावे.
काय खाऊ नये : इतर खाद्यपदार्थ.
फायदे : कमी वेळेत जास्त वजन घटते.
धोका : हा तेवढासा संतुलित आहार नाही. यामध्ये प्रोटिन (प्रथिने) व काबरेहायड्रेट यांसारखी पोषणतत्त्वे नसतात. हा डाएट अवलंबणार्‍याला दिवसभर वेळोवेळी भूक लागत राहते. एका आठवड्यापेक्षा जास्त दिवस हा डाएट पाळला तर शरीरामध्ये आवश्यक व्हिटॅमिन्सची (पोषणतत्त्वांची) कमतरता भासू लागते.
काम कसे करते : यामध्ये फॅट व कॅलरीज कमी असल्याने कमी कालावधीत जास्त वजन घटण्यास मदत होते. जोपर्यंत हा आहार चालू राहतो तोपर्यंत वजन घटणे चालू राहते. तो बंद करून नेहमीचे जेवण घेणे सुरू केल्यानंतर वजन परत वाढू लागते.
पुढील स्लाईडवर वाचा... अशाच 6 आहारांविषयी....