आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अ‍ॅसिडिटीपासून आराम देणारे लिंबू सरबत, जाणून घ्या काय आहेत फायदे...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लिंबू पाणी पिण्याचे शरीराला अनेक फायदे आहेत. यामुळे त्वचेची सुंदरता वाढण्यास मदत होते. शरीराला उर्जा मिळते. इतकेच नाही तर याने पचन संस्था देखील उत्तम राहण्यास मदत होते. लिंबूपाणी तुम्ही कोणत्याही ऋतुमध्ये पिऊ शकता. जाणून घ्या लिंबूपाणी पिण्याचे काय आहेत 9 फायदे...
1. इम्यून सिस्टम ठीक करते..

लिंबू पाणी पिण्याने शरीराची इम्यून सिस्टिम उत्तम राहण्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे अ‍ॅसिडिटी-गॅसेसचे होणारे त्रासापासून आराम मिळतो. याने पोटात होणा-या जंतुसंसर्गापासून रक्षण होण्यास मदत होते. लिंबात व्हिटॅमिन सी आणि एसकॉरबिक अ‍ॅसिड असते. याने पोट साफ राहण्यास मदत होते. यामध्ये अ‍ॅन्टी-इन्फ्लेमेटरी तत्व असल्याने पोटात असणा-या बॅक्टेरियापासून रक्षण होते तसेच सर्दी-खोकला होत नाही.
2. डायजेशन करण्यास मदत होते

लिंबात अशी बरीच तत्वे उपलब्ध असतात ज्यामुळे डायजेस्टिव सिस्टिममधील टॉक्सिन्स (विषारी तत्व) नाहीसे होतात. यासाठी रोज लिंबू पाणी पिले पाहिजे. लिंबू पाण्यामुले पोटाच्या तक्रारींपासून आराम मिळतो. तुम्हाला जर शरीरातीएल फॅट कमी करायचे असल्यास लिंबाचा फायदा होऊ शकतो. फॅट कमी करण्यासाठी कोमट पाण्यात लिंबू आणि मध टाकून प्यावे.
पुढे वाचा लिंबू पाण्याचे इतर फायदे...