राजस्थानमध्ये सध्या पुष्कर मेळ्याची धूम सुरू आहे. राजस्थानमध्ये सुरू असलेल्या या मेळ्याची चर्चा केवळ राजस्थानमध्येच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये होत असते. हा मेळा राजस्थानमधील प्रसिद्ध अशा मेळ्यांपैकी एक आहे. यामध्ये ऊंट, गाय, बकरी, म्हैस असे प्राणी विक्रिसाठी आणण्यात येतात. भारतामध्ये केवळ या एकाच मेळ्याची चर्चा होते असे नाही. तर येथे अनेक ठिकाणी वेग-वेगळ्या मेळ्यांचे आयोजन करण्यात येते. जे संपूर्ण आशियामध्ये फेमस आहे. विशेष म्हणजे हे मेळे पाहण्यासाठी जगभरतून पर्यटक येत असतात. आज आम्ही तुम्हाला भारतातील काही प्रसिद्ध मेळ्यांडबद्दल सांगणार आहोत.
1. पुष्कर मेळा, राजस्थान
राजस्थानचे पवित्र शहर पुष्कर येथे दरवर्षी लागणा-या मेळ्यांपैकी हा सर्वात मोठा उंटांचा मेळा आहे. यामध्ये साधारण 50 हजार उंट विक्रिस आणले जातात. याशिवाय येथे गाय, बकरी, म्हैस आणि इतर पशु-पक्षी विक्रिस आणले जातात. येथे जगातील एकमेव ब्रह्माजींचे मंदिर आहे.
पुढे वाचा, भारतामध्ये आयोजित होणा-या इतर मेळ्यांबद्दल...