आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरीच तयार करा या 9 गारेगार आइस्क्रिम-कुल्फी, वाचा सोपी रेसिपी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उन्हाळ्याचे दिवस आले की, काही तरी थंड खावेसे वाटते. त्यामध्ये जर घरामध्ये लहान मुले असतील तर त्यांची आइस्क्रीमची डिमांड सतत सुरू असते. पण या दिवसांमध्ये बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची शक्यता अधिक असल्याने अनेक घरांमध्ये मुलांना बाहेरचे आइस्क्रीम खाण्यास टाळले जाते. मुलांनाच काय तर आपल्यालाही दुपारच्या वेळी आइस्क्रिम खाण्याची इच्छा होत असते. यासाठीच आम्ही तुमच्यासाठी खास आइस्क्रिम रेसिपी घेऊन आलो आहोत...
1.द्राक्ष आइस्क्रिम
साहित्य :
- 500 ग्रॅम द्राक्षे,
- 500 ग्रॅम दही,
- 1 कप साखर,
- अर्धा कप दुधाची पावडर,
- अर्ध्या लिंबाचा रस,
- पाव कप क्रिम.
कृती
प्रथम द्राक्षे धुऊन मिक्सरमधून पल्प तयार करा आणि गाळून घ्या. दही पातळ कपड्यात बांधून दोन तास टांगून ठेवा. पाणी निथळून गेलेले दही कपड्यातून कढा व त्यात पिठीसाखर, दुधाची पावडर, लिंबाचा रस व द्राक्षान्चा पल्प घालून सेट होण्यस ठेवा. 3 तासांनी अर्धवट झालेले आइस्क्रीम बाहेर काढा व मिक्सरमधून फिरवून घ्या. पुन्हा सेट होण्यास ठेवा. काही तासांतच तुमचे आइस्क्रिम तयार आहेत... आता यावर द्राक्षांनी मस्त सजावट करा...
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, घरच्या घरी टरबुजाचे आइस्क्रीम कसे बनवावे याची रेसीपी...टरबुजाचे आइस्क्रीम, आंब्याचे आइस्क्रीम, किवी फळाचे आइस्क्रीम, व्हॅनिला आईस्क्रिम, बदाम कुल्फी, चॉकलेट आइस्क्रिम, द्राक्ष कुल्फी, फालुदा...