( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
अरे आत्ता मी इथे गाडीची चावी ठेवली होती कुठे गेली, अरे यार त्याने त्याचा नंबर दिला होता विसरलो बघ असे
आपण कुणा-ना-कुणा कडून ऐकत असतो याला विसरभोळेपणा असे म्हणतात. ब-याच वेळा अशा गोष्टी धावपळीमुळे होणे सहाजिक आहे. पण दिवसेंदिवस ही सवय वाढत असेल तर तुम्हाला तुम्ही घेत असलेल्या खाण्या-पिण्याच्या सवयीकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
आज आम्ही तुम्हाला असे 10 पदार्थ आणि काही सवयींबद्दल सांगणार आहोत. या पदार्थांच्या सेवनामुळे आणि सवयींमुळे तुम्ही दिवसेंदिवस विसरभोळे होत चालला आहात. वेळीच तुम्ही या सवयी आणि पदार्थ खाणे बंद केले नाही तर तुमची ही विसरण्याची सवय वाढू शकते.
1. सिगरेट
जर तुम्ही स्टाइल मारण्यासाठी सिगरेट पित असाल तर स्वत:ला संभाळा. सिगरेट जरी तुम्हाला स्टाइलिश बनवत असेल पण यामुळे तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीवर याचा विपरित परिणाम होतो हे लक्षात ठेवा. सिगरेट आणि स्मोकिंगवर करण्यात आलेल्या एका अभ्यासातून असे समोर आले आहे की, सिगरेट पिल्यामुळे तुमची मेमरी हळू-हळू कमी होण्यास सुरूवात होते.
पुढे वाचा, इतर सवयी आणि पदार्थांबद्दल...