Home | Health And Lifestyle | Yoga Day | 7 Types Of Pakoda Recipe

पावसात तयार करा ही गरमा-गरम भजी, 7 खमंग रेसिपी...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 12, 2017, 11:11 AM IST

पावसाळा सुरु झाला आहे. या थंडगार पावसात गरमा-गरम भजी खाण्याचा आनंद हा निराळाच आहे.

 • 7 Types Of Pakoda Recipe
  पावसाळा सुरु झाला आहे. या थंडगार पावसात गरमा-गरम भजी खाण्याचा आनंद हा निराळाच आहे. यासाठी आज आपण काही स्पेशल भजींची रेसिपी जाणुन घेणार आहोत. चला तर मग वाचा या रेसिपी...पनीर भजी, कोबी भजी, बटाटा भजी, बटाटा भजी, पालक - मेथीची भजी, कुरकुरीत कांदा भजी, कुरकुरीत कांदा भजी, मूग भजी, मिरचीची भजी...

  पनीरची भजी
  साहित्य:

  - 250 ग्रा. पनीर
  - 1 कप बेसन ( डाळीचे पीठ )
  - लहान अर्धा चमचा बेकींग पावडर
  - 1-2 चमचा काळी मिरी
  - मीठ चवीप्रमाणे
  - तेल तळण्यासाठी
  - कोथिंबीरीची चटणी वाढण्याकरता

  कृती:
  - बेसन ( डाळीचे पीठ ), मीठ व बेकिंग पावडर, काळी मिरी व पाणी टाकून भिजवावे.
  - पनीरचे चौकोनी तुकडे करा. मधोमध एक चीर मारुन त्यात हिरवी चटणी लावा.
  - आता पनीरचे तुकडे डाळीच्या पीठात बुडवून गरम तेलात सोडा. लालसर तळून घ्या. भजी खाण्यासाठी तयार आहे.

  सॉस किंवा चटणी बरोबर गरम-गरम वाढा.
  पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा अशाच काही सोप्या आणि चविष्ट भजी रेसिपी....कोबी भजी, बटाटा भजी, बटाटा भजी, पालक - मेथीची भजी, कुरकुरीत कांदा भजी, कुरकुरीत कांदा भजी, मूग भजी, मिरचीची भजी...
  (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsappआणि Facebookच्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 • 7 Types Of Pakoda Recipe
  कोबीची भजी
  साहित्य:

  - 3-4 कप बारीक चिरलेली कोबी
  - 2 चमचे बारीक चिरलेली भोपळी मिरची
  - 4 टेस्पून बेसन
  - 1 टेस्पून कॉर्न स्टार्च किंवा कॉर्न फ्लोअर
  - 2 हिरव्या मिरच्या
  - 3 लसणीच्या पाकळ्या
  - 1 टिस्पून जिरे
  - थोडेसे हिंग, हळद, लाल तिखट
  - कोथिंबीर, बारीक चिरून
  - चवीपुरते मिठ
  - तळण्यासाठी तेल
   
  कृती:
  - प्रथम चिरलेली कोबी आणि भोपळी मिरची एका भांड्यात एकत्र करावे. त्याला थोडे मिठ चोळावे ज्यामुळे भाज्यांना थोडे पाणी सुटेल.
  - मिरच्या आणि लसणीच्या पाकळ्या मिक्सरवर वाटून घ्याव्यात. किंवा मिरचीची आणि लसणीची पेस्ट उपलब्ध असेल तर ती वापरावी.
  - मिठ लावलेल्या भाज्यांमध्ये वर दिलेले सर्व साहित्य घालून मिक्स करावे. अगदी थोडे पाणी घालून कांदा भजीला भिजवतो तितपत घट्टसर भिजवावे.
  - तेल गरम करून भिजवलेल्या पिठाची लहान लहान बोंडं तळून घ्यावीत. भजी तळताना मध्यम आचेवर तळावीत नाहीतर भजी आतमध्ये कच्ची राहण्याचा संभव असतो.
   
   
 • 7 Types Of Pakoda Recipe
  बटाटा भजी
  साहित्य:

  - 2 मध्यम बटाटे
  - अर्धा कप बेसन
  - 3 चमचा पाणी
  - 1 चमचा तांदूळ पिठ
  - चिमूटभर खायचा सोडा
  - अर्धा चमचा जिरे
  - चवीपुरते मिठ
  - तळण्यासाठी तेल
   
  कृती:
  - बटाटे सोलून पातळ चकत्या करून साध्या पाण्यात साधारण 10-15 मिनिटे घालून ठेवावेत. शक्य असेल तर भजी बनवायच्या 3-4 तास आधी बटाट्याच्या कापट्या पाण्यात घालून ठेवाव्यात. यामुळे बटाट्याचा स्टार्च काहीप्रमाणात कमी होतो.
  - बटाट्याच्या चकत्या पाण्यात भिजताहेत तोवर एका भांड्यात बेसन तांदूळ पिठ एकत्र करून त्यात 3-4 चमचे पाणी घालून पिठ भिजवावे. त्यात जिरे, मिठ आणि सोडा घालून मिक्स करावे.
  - तेल तापत ठेवावे. बटाट्याच्या चकत्या पाण्यातून 3 मिनीटे काढाव्यात, म्हणजे बटाट्यावरचे एक्स्ट्रा पाणी भिजवलेल्या पिठात जाऊन पिठ अजून पातळ होणार नाही. तेल तापले कि बटाट्याच्या चकत्या पिठात बुडवून भजी तळून काढाव्यात.
  गरमागरम भजी लसणीच्या तिखटाबरोबर सर्व्ह कराव्यात.
  तसेच लादीपाव असेल तर हिरवी चटणी, चिंचेची आंबट-गोड चटणी आणि लसणीचे तिखट घालून भजीपावही सुंदर लागतो.
   
   
 • 7 Types Of Pakoda Recipe
  पालक - मेथीची भजी
  साहित्य

  - अर्धी गड्डी पालक आणि अर्धी गड्डी मेथी धुवून चिरून, 
  - 2 वाटया बेसन पीठ
  - 1 चमचा लाल तिखट
  - पाव चमचा हळद
  - 2 टेबल स्पून तेल
  - 1 टेबलस्पून पांढरे तीळ, 
  - पाव चमचा ओवा
  - पाव चमचा सोडा
  - चवीनुसार मीठ
  - तळण्याकरता तेल.
   
  कृती 
  - चिरलेला पालक व मेथी एकत्र करावी. 
  - त्यात डाळीचे पीठ, तिखट, हळद, मीठ, ओवा, तीळ, चवीनुसार मीठ घालून २ टेबलस्पून कडकडीत तेलाचे मोहन घालावे. 
  - थोडे पाणी घालून पीठ कालवावे. फार पातळ करू नये.
  - कढईत तेल तापवून वरील पिठाची भजी तळावीत.
   
   
   
 • 7 Types Of Pakoda Recipe
  कुरकुरीत कांदा भजी 
  - 1 मोठा लाल कांदा
  - तिखट, मीठ - चवीप्रमाणे
  - बेसन अंदाजे लागेल तितके
  - तेल तळण्यासाठी लागेल तितके
  -  हळद
  - असेल तर चिमुटभर ओवा
  - मुठभर कोथींबीर
   
  कृती -
  - कांदा अगदी बारीक उभा उभा कापावा. 
  - त्याच्या पाकळ्या नीट वेगवेगळ्या करुन त्यावर मीठ, तिखट, ओवा, हळद घालुन नीट मिसळुन 10 मिनीटे बाजुला ठेवावे. 
  - 10 मिनीटानंतर तळण्यासाठी तेल तापायला ठेवावे. 
  - तोपर्यंत कांद्याला पाणी सुटलेले असेल. त्यात थलथलीत भिजेल इतपत पीठ घालावे. 
  - पाणी अजीबात घालु नये. कोथींबीर घालुन त्यावर 1 चमचाभर गरम तेल घालावे. 
  - नीट चमच्याने मिसळुन गरम तेलात भजी करुन दोन्ही बाजुने कुरकुरीत तळाव्यात.
   

   
 • 7 Types Of Pakoda Recipe
  मूग भजी
  साहित्य:

  - अर्धा कप पिवळी मूग डाळ
  - 4-5 हिरव्या मिरच्या
  - चिरलेली कोथिंबीर
  - 1 चमचा लसूण पेस्ट
  - थोडेसे जिरे,
  -  हिंग, हळद गरजेप्रमाणे
  -  मिरपूड किंवा १-२ मिरी ठेचून (ऑप्शनल)
  - चवीपुरते मिठ
  - तळण्यासाठी तेल
   
  कृती:
  - मूग डाळ 3-4 तास पाण्यात भिजत ठेवावी. नंतर त्यातील पाणी काढून टाकावे. डाळ पाणी न घालता बारीक वाटून घ्यावी.
  - वाटलेल्या डाळीत बारीक चिरलेल्या मिरच्या, लसूण पेस्ट, कोथिंबीर, जिरे, हिंग, हळद, मिरी आणि चवीपुरते मीठ घालावे.
  - मिडीयम हाय गॅसवर कढईत तेल तापत ठेवावे. चमच्याने किंवा हाताने डाळीचे मिश्रणाचे छोटे गोळे तेलात सोडावे. भज्यांना गोल्डन ब्राऊन रंग आला कि थोडावेळ कागदावर / किचन टॉवेलवर अधिकचे तेल काढून टाकावे.
  - हिरव्या चटणीबरोबर किंवा चिंच,गूळ,खजूराच्या गोड चटणीबरोबर गरमागरम भज्या खाव्यात.
   

   
 • 7 Types Of Pakoda Recipe
  मिरचीची भजी 
  साहित्य:

  - 8 ते 10 लांब मिरच्या
  - 3-4 कप बेसन
  - 1 टेस्पून तांदुळाचे पीठ
  - हळद
  - चिमूटभर खायचा सोडा
  - चवीपुरते मीठ
  - तळण्यासाठी तेल
   
  कृती:

  - मिरच्या धुवून घ्याव्यात. एका बाजूने चीर देऊन आतील बिया काढाव्यात. (टीप)
  - बेसन, तांदूळ पीठ, हळद, मीठ एकत्र करून घ्यावे. त्यात साधारण पाउण कपापेक्षा थोडे कमी पाणी घालून पीठ भिजवावे. सोडा घालून मिक्स करावे. पिठाची कन्सिस्टन्सी थोडी दाटसर असावी.
  - तळणीसाठी तेल तापत ठेवावे. मिरच्या पिठात बुडवून नीट कोट करून घ्याव्यात. मध्यम आचेवर टाळाव्यात.
  गरमागरम सर्व्ह कराव्यात.
   
   

Trending