Home | Health And Lifestyle | Yoga Day | news for Birth Control And Contraception Myths

गर्भनिरोधकाशी संबंधित हे Myths तुम्‍हाला माहिती आहेत का, नसतील तर वाचा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 28, 2017, 12:15 AM IST

गर्भनिरोधकांबबात अजूनही अनेकांमध्‍ये अनभिज्ञता आणि अनास्था आहे. त्‍यामुळे थोडेशी बेपर्वाई केली तर नको ते घडते.

 • news for Birth Control And Contraception Myths

  गर्भनिरोधकांबबात अजूनही अनेकांमध्‍ये अनभिज्ञता आणि अनास्था आहे. त्‍यामुळे थोडेशी बेपर्वाई केली तर नको ते घडते. त्‍यामुळेच divyamarathi.com तुम्‍हाला सांगणार आहे गर्भनिरोधकाशी संबंधित 7 Myths...

  नको असलेली गर्भधारणा टाळण्‍यासाठी गर्भनिरोधक गोळी, कंडोम, विशिष्‍ट्य दिवस, इंजेक्शन्स या सारखे काही उपाय आहेत. पण, त्‍या बाबत आपल्‍या सर्व काही माहिती आहे, असे अनेकांना वाटते. त्‍यामुळेच हे उपाय करूनही गर्भधारणा होते. ती कशी टाळावी, गर्भनिरोधकांबाबत काही अनभिज्ञता हे प्रत्‍येकाने जाणून घेणे महत्‍त्‍वाचे आहे.

  पुढील स्‍लाइड्सवर वाचा, गर्भनिरोधकाशी संबंधित 7 Myths...

 • news for Birth Control And Contraception Myths

   नियमित लैंगिक संबंध असलेली जोडपी बऱ्याचदा काँडोमचा वापर करत असतात; परंतु काँडोम कधी आणि योग्य प्रकारे कसा वापरावा; तसेच त्यात अपयशाची किती शक्यता आहे याबाबतीत खूपच अज्ञान आहे. बरेच जण एका एकावर एक असे दोन कंडोम चढवतात. परंतु, ते एकमेकांशी रगडतात. त्‍यातून वीर्य बाहेर येऊ शकते. त्‍यामुळे एकच कंडोम वापरावा.

   

 • news for Birth Control And Contraception Myths

  अनेक जण  संबंध पूर्ण होण्याआधी शिस्न बाहेर काढतात. ही एक ‘फूलप्रूफ मेथड’ आहे असा अत्यंत चुकीचा समज रूढ आहे. तसे केल्‍यानेही गर्भधारणा होऊ शकते.

   

 • news for Birth Control And Contraception Myths

  ‘आय पिल’ ही गर्भपातासाठी वापरली जाणारी गोळी आहे.  डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळणाऱ्या औषधांच्या गटात ती वर्गीकृत करण्यात आली. यातला ‘इमर्जन्सी’ हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. ही गोळी आपत्कालीन परिस्थितीत एकदाच वापरायचा असते. पण, दुर्दैवाने हेकोणीच समजून घेत नाही. गर्भनिरोधक गोळ्यांसारखी ही गोळी रोज घ्यायची नसते. तसेच एका महिन्यात वारंवार असुरक्षित संबंध आल्यास या गोळीचा उपयोग होत नाही.

   

 • news for Birth Control And Contraception Myths

  मासिक काळात सेक्स करताना  सुरक्षेची काही गरज  नाहीए असे अनेकांना वाटते. पण, सिकपाळी दरम्यान सेक्स केल्याने गर्भधारणा होण्याची शक्यता कमी आहे. या काळात गर्भधारणा होत नाही, असा त्‍याचा अर्थ नाही.

   

 • news for Birth Control And Contraception Myths

  कंडोमच्‍या ऐवजी काही जण फुग्‍याचा वापर करतात. कंडोम आणि फुग्‍यांचा आकार जरी सारखा असला तरीही फुग्‍यांची निर्मिती वेगळ्या पदार्थाने आणि कंडोमची वेगळ्या पदर्थाने होते, हे लक्षात घेणे महत्‍त्‍वाचे आहे. त्‍यातून गर्भधारणा होऊ शकते.

   

 • news for Birth Control And Contraception Myths

  कामक्रीडा झाल्‍यानंतर अंघोळ करणे किंवा योनीला धुवून घेतल्‍याने गर्भधारणा होत नाही, असा अनेकांचा समज आहे. तो पूर्णत: चुकीचा आहे. उलट योनीमध्‍ये साबण गेल्‍याने संसर्ग होऊ शकतो.

   

 • news for Birth Control And Contraception Myths

  स्तनपानाच्‍या काळात गर्भधारणा होत नाही, असे असे ठामपणे सांगता येत नाही.  या काळातही गर्भधारणा होऊ शकते.

   

Trending