Home | Health And Lifestyle | Yoga Day | Essy Tips For Clothes Iron

कपडे होतील चुटकीसरशी प्रेस, वाचा या Simple टिप्स...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 31, 2017, 09:00 AM IST

कपडे धुतल्यानंतर ते प्रेस करणे खुप मोठे काम असते. अनेक लोक कपडे प्रेस करण्यासाठी बाहेर देतात.

 • Essy Tips For Clothes Iron

  कपडे धुतल्यानंतर ते प्रेस करणे खुप मोठे काम असते. अनेक लोक कपडे प्रेस करण्यासाठी बाहेर देतात. परंतु कपडे बाहेर प्रेससाठी देण्यात अनेक अडचणी असतात. ते कपडे आपल्याला वेळेत मिळत नाही. यामुळे कपडे स्वतः प्रेस करणे खुप चांगले असते. जर तुम्ही तुमचे कपडे घरीच प्रेस करत असाल तर, आम्ही तुमच्यासाठी काही सोप्या टिप्स घेऊन आलो आहेत. या टिप्सचा वापर करुन तुम्ही खुप कमी वेळेत आणि कमी मेहनतीत कपडे प्रेस करु शकता.

  कपडे प्रेस करण्याच्या सोप्या टिप्स जाणुन घ्यायच्या असल्यास पुढील स्लाईडवर क्लिक करा...

  (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 • Essy Tips For Clothes Iron

  1. प्रत्येक कपड्यावर स्प्रे करण्याऐवजी तुम्ही एक स्वच्छ टॉवेल ओला करा. यानंतर हे हलक्या हाताने पिळून घ्या. तुम्ही जेवढ्या कपड्यांना प्रेस करणार आहात तेवढे कपडे त्या टॉवेलमध्ये गुंडाळून ठेवा. असे केल्याने एक-एक कपड्यावर स्प्रे करण्याची गरज पडणार नाही. कपड्यात हलका ओलावा येईल.

   

 • Essy Tips For Clothes Iron

  2. कपड्यांना ड्रायरने वाळवण्याच्या पध्दतीने देखील तुमचा वेळ वाचू शकतो. स्लो स्पिनवर कपडे वाळवल्यावर ते जास्त गोळा होत नाही. ज्यामुळे त्यांना प्रेस करताना खुप कमी मेहनत करावी लागते.

   

 • Essy Tips For Clothes Iron

  3. कपडे धुतल्यानंतर योग्य प्रकारे ठेवणे देखील महत्त्वाचे असते. जर तुम्ही ते तसेच गोळा झालेले ठेवले तर त्यावर प्रेस करताना जास्त मेहनत घ्यावी लागते. अशात त्यांना योग्य प्रकारे ठेवणे खुप महत्त्वाचे असते.

   

 • Essy Tips For Clothes Iron

  4. कपडे धुतल्यानंतर ऊन्हात वाळवताना ते तसेच दोरीवर टाकू नका. या अगोदर कपडे दोन्ही हातांनी झटकून घ्या. असे केल्याने ते काही प्रमाणात सरळ होतील आणि अशा प्रकारे वाळवलेले कपडे प्रेस करण्यास सोपे जाईल.

   

 • Essy Tips For Clothes Iron

  5. प्रत्येक कपडा प्रेस करण्याची एक पध्दत असते. कपडा पुर्ण पसरवून एका कोप-यातून सुरुवात करुन दूस-या कोप-यावर पोहोचावे लागते. मध्ये मध्ये प्रेस केल्याने कपड्याला योग्य प्रकारे प्रेस होऊ शकत नाही. यामुळे वेळ देखील जास्त लागतो.

Trending