Home | Health And Lifestyle | Yoga Day | How To Make Home Made Cold Drink Bottle Mosquito Trap

असे जुगाड करुन मारु शकता घरातील सर्व डास, फक्त करा हे काम...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 04, 2018, 03:52 PM IST

डास दूर करण्यासाठी मार्केटमध्ये अनेक प्रकारचे प्रोडक्ट आणि डिव्हाइस उपलब्ध आहेत.

 • How To Make Home Made Cold Drink Bottle Mosquito Trap

  डास दूर करण्यासाठी मार्केटमध्ये अनेक प्रकारचे प्रोडक्ट आणि डिव्हाइस उपलब्ध आहेत. यामध्ये मॉस्किटो कॉइल, बॉडीवर लावता येणारे ऑडोमॉस यांचा समावेश आहे. तर ऑलआउट किंवा मोर्टीनसारखे डिव्हाइसही उपलब्ध आहेत. परंतू आज आम्ही तुम्हाला सर्वात स्वस्त एक ट्रिक सांगणार आहोत. हे जुगाड करुन तुम्ही घरातील डास दूर करु शकता. टाकाऊ वस्तूंचा वापर करुन तुम्ही हे जुगाड करु शकता.


  कोल्डड्रिंकच्या बॉटलचे जुगाड
  कोल्डड्रिंकच्या वापरलेल्या बॉटलने तुम्ही मॉस्किटो ट्रॅप बनवू शकता. या ट्रॅपची एक खास गोष्ट म्हणजे, या बॉटलमध्ये असे लिक्विड असते, जे डासांना आकर्षित करते. डास यामध्ये येतात आणि फसून जातात. ते बाहेर निघू शकत नाही आणि मध्येच मरुन जातात.


  या गोष्टी आहेत गरजेच्या


  1. 2.5 लीटर कोल्डड्रिंकची रिकामी बॉटल
  2. 500ml पाणी
  3. अर्धा चमचा मध
  4. रुंद पॅकिंग टॅप
  5. ब्राउन शुगर
  6. कात्री किंवा पेपर नाइफ


  पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या डास मारणारे हे ट्रॅक बनवण्याची पध्दत...


  (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 • How To Make Home Made Cold Drink Bottle Mosquito Trap

  सर्वात पहिले एक 2.5 लीटरची कोल्डड्रिंकची रिकामी बॉटल घ्या. आता ही बॉटल मधून कापा. कापण्यासाठी कात्री किंवा पेपर नाइफचा वापर करता येऊ शकतो. आता कापलेल्या भागामध्ये 500ml पाणी टाका आणि त्यामध्ये 2 स्पून ब्राउन शुगर टाका. आता हे चांगले मिक्स करुन घ्या. शुगर मिक्स झाल्यानंतर पाण्याचा रंग ब्राउन होईल.
   

 • How To Make Home Made Cold Drink Bottle Mosquito Trap

  आता या लिक्विडमध्ये एक चमच्याच्या चतुर्थांश भाग मध मिसळा. आता कापलेल्या बॉटलचा वरचा भाग या खालच्या भागावर उलटा ठेवायचा आहे. हे मिश्रण बॉटलचे तोंड आणि आजुबाजूच्या भागावर चांगल्याप्रकारे लावा. यानंतर हे उलटे करुन पॅकिंग टॅपच्या मदतीने फिक्स करा. 

   

 • How To Make Home Made Cold Drink Bottle Mosquito Trap

  आता टॅपच्या वरचा बॉटलचा एक्स्ट्रा भाग कात्रीने कापून घ्या. अशाप्रकारे डास मारण्याचे जुगाड तयार आहे. बॉटलमध्ये भरलेल्या लिक्विडने डास आकर्षित होतात आणि बॉटलमध्ये जातात. परंतू बाहेर निघू शकत नाही. अशा वेळी डास ट्रॅपमध्ये जाऊन मरतात.

Trending