Home | Health And Lifestyle | Yoga Day | Take care of these things for wearing colour denim style

कलर डेनिमसोबत करा भन्‍नाट ड्रेसिंग स्‍टाईल, वाचा Tips

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Feb 07, 2018, 07:15 PM IST

फॅशन फ्रिक तरुणाईला प्रत्येक ओकेजनसाठी वेगवेगळे स्टाईल आजमावयची सवय असते. मुला आणि मुलींसाठी डेनिम म्हणजे सर्वात 'कूल' अ

 • Take care of these things for wearing colour denim style

  फॅशन फ्रिक तरुणाईला प्रत्येक ओकेजनसाठी वेगवेगळे स्टाईल आजमावयची सवय असते. मुला आणि मुलींसाठी डेनिम म्हणजे सर्वात 'कूल' असा पर्याय असतो. डेनिम वापरताना आपण नेहमी ब्लू आणि ब्लॅक हे दोनच ऑप्शन जास्त निवडतो. पण सध्या तरुणाईसाठी 'कलर डेनिम' हा भन्नाट ऑप्शन आहे. कलर डेनिम ही संकल्पना जितकी नवी आहे तितकीच हटके आहे. ज्याप्रमाणे आपण एखाद्या कुर्त्यावर लेगिन्स मॅच करतो तसच या कलर डनिमही वापरता येतात. तेव्हा या कलर डेनिम घालताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात जाणून घेऊयात स्पायकर इंडियाचे डिझायनर हेड अभिषेक यादव यांच्याकडून...

  पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, डेनिम घालताना घ्‍यावी या गोष्‍टींची काळजी...

 • Take care of these things for wearing colour denim style

  जीन्स फीट 

  जीन्स घेताना कधीही कमरेची साईज बघून घेणे आवश्यक असते. त्यात कलर डेनिम घेताना आपल्या बॉडी टाईप नुसार कलर डेनिम पसंत करावी. खासकरून ब्लू जीन्स स्किनी फिट व रेग्युलर फिटिंग मध्ये उपलब्ध असते. अशा डेनिम सर्व बॉडी टाईप वर शोभून दिसतात.

 • Take care of these things for wearing colour denim style

  कलर

  कलर डेनिम निवडताना आपल्या स्किनटोनचा देखील विचार करावा. तसेच आपण त्यावर शर्ट, टी-शर्ट कि अजून एखादा टॉप घालतोय हे लक्षात घ्यावे. त्यानंतर कुठल्या ठिकाणी जसे ऑफिस, आऊटिंग कि पार्टीला जाताना त्यानुसार वापरावे. आपल्या स्किनटोन शी साजेसे कलर डेनिम निवडावी कारण अनेक कलर्सची रेंज बाजारात उपलब्ध आहेत.

 • Take care of these things for wearing colour denim style

  टॉपवेयर ऑप्शन 

  आपण डेनिम कोणत्या टॉप किंवा शर्ट वर घालणार आहेत त्यानुसारच डेनिमची निवड करावी. ऑफिसमध्ये सहसा डार्क रंगाची डेनिम वापरली तर एखादा चेक्स किंवा प्लेन टॉप किंवा टि-शर्ट वापरावा. फिक्या रंगाची डेनिम असल्यास त्यावर फअलोरल प्रिंटचा एखादा टॉप फ्रेश लूक देतो.  न्यूट्रल कलर जसे कि सफेद, ग्रे अश्या कलरच्या टॉपवेयर डार्क कलरच्या डेनिमवर सूट होतात.

   

 • Take care of these things for wearing colour denim style

  ओकेजन
  पार्टी ऑफिस किंवा एखाद्या ट्रिपमध्ये सर्वात हटके दिसण्यासाठी कलर डेनिम हा "ऑल टाईम बेस्ट" ऑप्शन आहे. आणि सर्वात स्टायलिश दिसण्यासाठी यंगस्टर्स मध्ये अशा डेनिमची पसंती दिसून येते.

   

 • Take care of these things for wearing colour denim style

  स्टाईल  
  जेव्हा तुम्ही एखादी डेनिम निवडता, तेव्हा ती केवळ फिटिंग किंवा कलरनुसारच नाही, तर डिझाईन व स्टायलिंग याची उत्तम सांगड असणेही महत्त्वाचे असते.

 • Take care of these things for wearing colour denim style

  फॅब्रिक
  कलर डेनिम घेताना त्याचा दर्जा तपासणे महत्त्वाचे असते. जेव्हा आपण डेनिम घालतो, ती बराच वेळासाठी आपल्या स्किनला लागून असते. अशावेळी त्याचा दर्जा व त्यामध्ये कॉटनचा वापर जास्त असावा. त्यासाठी त्या कपड्याची माहिती पाहावी.

   

 • Take care of these things for wearing colour denim style

  डेनिमचे वजन  
  सीझननुसार डेनिमचे सिलेक्शन करावे. लाईट वेट डेनिम या उन्हाळ्यात वापरू शकता, मिडियम वेट डेनिम या एव्हरग्रीन असतात. तर जास्त वजनाच्या डेनिम या थंडीत वापरू शकता.

   

  कलर डेनिम आपल्याला नेहमीच स्टायलिश लूक देतो. पण एकाच रंगाचे टॉप आणि बॉटम वेयर असा पर्याय आपल्या स्टाईल स्टेटमेंट वर  प्रश्न उठवणारे ठरू शकतील.

   

Trending