Home | Health And Lifestyle | Yoga Day | article about banarasi sarees

बनारसी साड्या अन् लेहेंगे आहेत यांचे खास वैशिष्ट्य

अस्मिता अग्रवाल, फॅशन लेखिका, नवी दिल्ली | Update - Jun 18, 2017, 03:00 AM IST

बनारसी साड्या आणि टेक्सटाइलला समर्पित ‘वॉर्प अॅण्ड वेफ्ट’ला २० वर्षे पूर्ण होत आहे. हा एक असा ब्रँड आहे जो पूर्णत: बनारसी साड्यांकरिता समर्पित आहे.

 • article about banarasi sarees
  बनारसी साड्या आणि टेक्सटाइलला समर्पित ‘वॉर्प अॅण्ड वेफ्ट’ला २० वर्षे पूर्ण होत आहे. हा एक असा ब्रँड आहे जो पूर्णत: बनारसी साड्यांकरिता समर्पित आहे. याचे स्टोअर म्युझियमसारखे आहे आणि मोहिमेशी संबंधित प्रत्येक क्षेत्रातील महिलांशी जोडलेले आहे.

  वॉर्प आणि वेस्ट असा ब्रँड आहे, जे फॅशन व्यवसायात गेल्या दोन दशकांपासून आपले स्थान कायम राखून आहे. २०व्या वाढदिवसाला या ब्रँडने आपल्या नवीन मोहिमेमध्ये मॉडेल्सला न घेता प्रत्येक क्षेत्रातील महिलांना घेतले आहे. यामध्ये देवीदयाल (लेखिका), नम्रता जकारिया शर्मा (पत्रकार), श्रीगोस्वामी (गॅलरिस्ट), शीना सिप्पी (फोटोग्राफर) यांचा समावेश आहे.
  ब्रँडच्या मालक सागरिका राय अाहेत. वॉर्प अॅण्ड वेस्टने नुकतेच एक प्रदर्शन भरवले होते. ज्यात बनारसी पदार्थांशिवाय बनारसी साड्यांची चमक पाहायला मिळाली.या इव्हेंटच्या थीमचे नाव गुलाबी असे होते. याकरिता मिलेनियल पिंक येथे इंडियन टि्वस्टसोबत दिसून आला. थीमनुसार या जागेला सुगंधित ट्युबरोसिस, टॅसल, रोज पॅटल, साडी व गुलाबी चड्ड्यांनी सजवण्यात आले होते.
  नवीन स्टोअर दाखवतो देशाच्या टेक्सटाइलचा इतिहास
  या सेलिब्रेशनच्या आधी वॉर्प अॅण्ड वेफ्टला मोठ्या स्टोअरमध्ये स्थलांतरित केले होते. ते जुन्या स्टोअरजवळच होते. या जागी आता भारत टेक्सटाइलचा इतिहास दिसून येतो. सागरिका सांगतात- बनारसी साड्यांची व्याप्ती सातत्याने वाढतच आहे. याकरिता टेक्सटाइल शोकेस करण्यासाठी जास्त जागेची गरज होती. येथे साडी, फेब्रिक आणि लहंगे ठेवण्यात आले होते.

  बनारसी साड्यांना जगभरात पोहोचवण्याची इच्छा
  टेक्सटाइल गॅलरी व्हाइट आणि गोल्ड थीम फॉलो करत आहे. मला बनारसी साड्या संपूर्ण जगभरात पोहोचवण्याची इच्छा आहे. याकरिता इंटेरियर एथनिक ठेवला नव्हता. आयडिया ही होती की केपटाऊन, कोलंबो आणि चेन्नईतून येणारा क्लायंंट एकसारखा अनुभव करावा याकरिता इंटेरियर्स चिक आणि स्टायलिश ठेवला आहे. ज्यात टेक्सटाइलसोबत एस्थेटिक्सदेखील दिसावा.
  आमचे डिजान्स खूप एडॉप्टेबल आहे. स्टोअरमध्ये उडलेली जागा आहे आणि नैसर्गिक प्रकाश जास्त आहे. वॉर्म आणि वेलकमिंग वातावरण मिळते, ज्यात साड्यांना खास सजावट करण्याची संधी मिळत आहे.
  स्टोअरमध्ये साड्या विक्रीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये मेट्रोपॉलिटन शहरांमध्ये आपले काम करणारी आणि नवऱ्यांवर अवलंबून न राहणाऱ्या महिलांचा ट्रेंड सेट झाला आहे. पण परिधानामध्ये पश्चिमी सभ्यताची झलक दिसून येते.
  आईवडिलांशी संबंधित वस्तूदेखील यात सहभागी
  वडिलांच्या कलेक्शनचे जुने शँडलियर, तसेच रॉयल हॉर्स कॅरेजचे विंटेज लॅप्सीही येथे लावले आहे. जी सागरिका यांच्या आईने भेट दिली होती.स्टोअरमध्ये सागरिकांनी त्यांच्या बालपणातील बनारसच्या घरातील अाठवणीही लावल्या आहेत.

 • article about banarasi sarees
 • article about banarasi sarees

Trending