Home | Health And Lifestyle | Yoga Day | curtains of bedroom

फिकट रंगाचे आणि झालरचे ठेवा तुमच्या बेड रूमचे पडदे

दिव्य मराठी | Update - Sep 02, 2017, 03:00 AM IST

शयनकक्षाला हिरवी थीम दिली आहे. यासाठी पलंगाच्या मागच्या भिंतीवर हिरवे सफरचंद चितारले आहे. हिरव्या रंगाला मॅॅच करत पूर्ण

 • curtains of bedroom
  झालरचे रेशमी पडदे
  दिवानखाण्याला स्वप्नवत सजवण्यासाठी झालरचे रेशमी पडदे लावले आहेत. नाजूक लूक आणि बॉक्स प्लीट रफल्स तसेच लायनिंगचे रेशमी पडदे लावले आहेत. सागरी हिरवा रंग असून पांढऱ्या भिंतीवर ते अाल्हाददायी वाटतात. सोफा गडद हिरव्या रंगाच्या पट्ट्यांचा आहे. रंगात बदल दाखवण्यासाठी तजेलदार गुलाबी रंगाची खुर्ची ठेवली आहे.
  आणखी वाचण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...

 • curtains of bedroom
  बोल्ड पेअर
   
  शयनकक्षाला हिरवी थीम दिली आहे. यासाठी पलंगाच्या मागच्या भिंतीवर हिरवे सफरचंद चितारले आहे. हिरव्या रंगाला मॅॅच करत पूर्ण लांबीचे पडदे लावले आहेत. त्यामुळे खोली भव्य दिसत आहे. पलंगावर हिरवे कव्हर लावले आहे. मॅट्रेसवर  पांढरी चादर टाकली. पडद्यामागे तागाचे ब्लाइंड्स दिसत आहेत. पीच रंगांची भिंत हिरव्याच्या विरुद्ध रंगाची आहे.
 • curtains of bedroom
  एकाच रंगातील विविध छटा

  शयनकक्षाची भिंत गडद जांभळी आहे. यावर साजेशा फिकट जांभळ्या रंगाचे पडदे लावले आहेत. कोपरे उठावदार करण्यासाठी सोनेरी लाकडी चौकट असलेला कॉम्फी सोफा ठेवलाय. सोफ्याच्या मागे भिंतीवर पांढऱ्या रंगाची चित्रकृती आहे. गडद रंगावर ही उठून दिसते. सोफ्यापाशी सोनेरी स्टँडचा फिकट जांभळा लँप ठेवलाय.  
 • curtains of bedroom
  काळ्या-पांढऱ्या रंगाचा वापर

  पँट्रीसाठी काळ्या-पांढऱ्या रंगाची संगती वापरण्यात आली आहे. छोट्याशा पँट्रीमध्ये पांढऱ्या भिंतीवर काळे कॅबिनेट लावले आहेत. खिडकीवर कलात्मक रंगांच्या पॅटर्नचा वापर केला आहे. पांढरा रोलर पडदा लावला असून काळ्या स्टोनचे विंडो सील आहे. काळ्या चौकटीत चित्राकृती असून पँट्रीमधील नॅपकिनचा रंगदेखील काळा-पांढरा आहे. 

Trending