Home | Health And Lifestyle | Yoga Day | Fasting Food Special Recipes

घरातच झटपट बनवा उपवासाचे हे 10 रुचकर पदार्थ, जाणून घ्या रेसिपी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 27, 2017, 12:31 PM IST

उपवास म्हटले तर शाबुदाणा खाऊन कंटाला येतो. यासाठीच आम्ही तुमच्यासाठी काही खास उपवासाच्या रेसिपी सांगणार आहोत.

 • Fasting Food Special Recipes
  उपवास म्हटले तर शाबुदाणा खाऊन कंटाला येतो. यासाठीच आम्ही तुमच्यासाठी काही खास उपवासाच्या रेसिपी सांगणार आहोत. थोडा कसरत केली की, उपवासाचे विविध पदार्थ बनवता येतात. अगदी झटपट आणि चविष्ट पदार्थ आपण सहज बनवू शकतो. चला तर मग पाहुया अशेच काही रुचकर उपवासाचे पदार्थ...
  उपवासाचा ढोकळा
  साहित्य :

  - शिंगाडा पीठ दोन वाटी
  - भाजलेल्या दाण्याचे कूट एक वाटी
  - आंबटसर ताक दोन वाटी
  - मिरची
  - आले
  - मीठ
  - जिरे
  - खाण्याचा सोडा
  - ओले खोबरे थोडेसे
  कृती :
  - शिंगाडा पीठ 2-3 तास ताकात भिजवून ठेवावे. त्यात अंदाजे चवीपुरते मीठ, आले व मिरच्याचे वाटण, थोडा सोडा, थोडे जिरे घाला. चांगले कालवून घ्या. मिश्रण तयार करा.
  - मग एका चपट्या स्टीलच्या डब्याला आतून तुपाचा हलकासा हात लावून त्यात वरील पिठाचे मिश्रण घालावे.
  - नंतर अर्धा तास कुकरमध्ये वाफवून घ्या. निवत आल्यावर वड्या पाडा. वड्यांवर थोडेसे किसलेले ओले खोबरे पेरावे...
  तुमचा चटपटीत उपवासाचा ठोकळा तयार आहे...
  पुढीस स्लाईडवर वाचा... रुचकर पदार्थांच्या रेसिपी....उपवासाचा बटाटा वडा, रताळ्याची कचोरी, खजूर मिल्क शेक, रताळा स्वीट, बटाटापूरी आणि असेच काही चविष्ट पदार्थ...
  (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

 • Fasting Food Special Recipes
  केळीचा रायता
  साहित्य

  1. पिकलेली केळी: ३
  2. वाळलेले बारीक खोबरे: १/२ कप
  3. लिंबू: १
  4. वेनिला किंवा साधे दही: १ कप
  5. बारीक कापलेले बदाम: १ टेबल स्पून
  कृती
  - वाळलेले बारीक खोबरे कोरडे च तांबुस होईपर्यंत भाजा.
  - केळ्यांचे तुमच्या आवडीनुसार काप करा. त्या कापांना लिंबाचा रस चांगला लावा म्हणजे केळी काळी पडणार नाहीत.
  - त्या कापांमधे दही, खोबरे आणि बदाम टाकून चांगले एकत्र करा. झाला तुमचा रायता तयार.
  - तुम्ही हा रायता गार करून किंवा तसाच खाऊ शकता. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्यात थोडी साखर घालू शकता.
  - हा रायता तुम्ही साइड डिश म्हणून किंवा स्नॅक म्हणून तसेच खाऊ शकता.
   
   
 • Fasting Food Special Recipes
  उपवासाचा बटाटा वडा
  सारणासाठी साहित्य

  1. 1 किलो उकडलेले बटाटे
  2. 1 कच्चा बटाटा किंवा १ रताळे किसलेले
  3.  आले
  4. हिरव्या मिरच्या(उपवासाला चालत असल्यास)
  5. बारीक कापलेली कोथिंबीर
  6. चवीप्रमाणे मीठ
  7. साखर
  8. एक चमचा लिंबू रस
  9. दाण्याचा कुट
  10. किसलेला ओला नारळ
   
  कव्हरसाठी साहित्य
  1. राजगिरा पीठ
  2. शिंगाडा पीठ
  3. साबूदाणा पीठ (नसले तरी चालेल)
   
  कृती
  - प्रथम हिरव्या मिरच्या, आले व थोडेसे जीरे घालून वाटून घ्या. बटाटे गरम असतानाच सोलून घ्या व बारीक करा.
  - नंतर ते गार झाल्यावरच त्यात चवीप्रमाणे आल्यासह मिरचीचा ठेचा, दाण्याचा कुट, खोवलेला ओला नारळ घाला.
  - नंतर त्यात चवीप्रमाणे मीठ व एक चमचा साखर घाला वर लिंबाचा रस टाका व सर्व मिश्रण हाताने एकजीव करा.
  - एकजीव झालेल्या सारणाचे तळहाताला थोडे पाणी लावून चपटे वडे थापून घ्या. सर्व पीठे एकत्र करुन त्यात पाणी घालून सरबरीत करा.
  - त्यात थोडेसे मीठ, तिखट व किसलेला बटाटा किंवा रताळे घाला. कढईत तेल घालून तापवा.
  तेल गरम होताच त्यातून एक चमचा तेल काढून सरबरीत केलेल्या पिठात टाका.
  - नंतर तापलेल्या तेलात चिमुटभर मीठ टाका म्हणजे वडे तेलकट होत नाहीत. वडे पिठात घोळवून तळून काढा व गरमागरम वडे खोबर्‍याच्या चटणी सोबत सर्व्ह करा.
   
   
  पुढील स्लाईडवर वाचा...रताळ्याची कचोरी
 • Fasting Food Special Recipes
  रताळ्याची कचोरी
  सारण

  1. १ मूठ चिरलेली कोथिंबीर
  2. १ वाटी खवलेले खोबरे
  3. ४-५ हिरव्या मिरच्या
  4. ५० ग्रॅम बेदाणा
  5. मीठ
  6. साखर
  कव्हरसाठीचे साहित्य
  1.  २५० ग्रॅम रताळी
  2. १ मोठा बटाटा
  3. थोडेसे मीठ
  कृती
  - रताळी व बटाटे उकडून घ्यावेत व सोलून, हाताने कुस्करून बारीक करावे.
  - त्यात थोडे मीठ घालावे. १/२ चमचा तुपावर मिरच्यांचे तुकडे परतून घ्यावेत. नंतर गॅसवरुन खाली उतरवून, त्यात इतर सर्व वस्तू घालुन सारण करावे.
  - रताळ्याची पारी करून त्यात थोडे सारण करून कचोर्‍या ठेवाव्यात. नंतर आयत्या वेळी वर्‍याच्या तांदळाच्या
  - पिठात घोळवून तुपात तळाव्यात.
  - गरमगरम खायला द्याव्या. फार सुंदर लागतात. उपवासाला एकदम चांगल्या.
   
   
  पुढील स्लाईडवर वाचा...खजूर मिल्क शेक
   
   
 • Fasting Food Special Recipes
  रताळ्याची कचोरी
  सारण

  1. १ मूठ चिरलेली कोथिंबीर
  2. १ वाटी खवलेले खोबरे
  3. ४-५ हिरव्या मिरच्या
  4. ५० ग्रॅम बेदाणा
  5. मीठ
  6. साखर
  कव्हरसाठीचे साहित्य
  1.  २५० ग्रॅम रताळी
  2. १ मोठा बटाटा
  3. थोडेसे मीठ
  कृती
  - रताळी व बटाटे उकडून घ्यावेत व सोलून, हाताने कुस्करून बारीक करावे.
  - त्यात थोडे मीठ घालावे. १/२ चमचा तुपावर मिरच्यांचे तुकडे परतून घ्यावेत. नंतर गॅसवरुन खाली उतरवून, त्यात इतर सर्व वस्तू घालुन सारण करावे.
  - रताळ्याची पारी करून त्यात थोडे सारण करून कचोर्‍या ठेवाव्यात. नंतर आयत्या वेळी वर्‍याच्या तांदळाच्या
  - पिठात घोळवून तुपात तळाव्यात.
  - गरमगरम खायला द्याव्या. फार सुंदर लागतात. उपवासाला एकदम चांगल्या.
   
   
  पुढील स्लाईडवर वाचा...खजूर मिल्क शेक
 • Fasting Food Special Recipes
  रताळा स्वीट
  साहित्य

  1.  अर्धा किलो रताळी
  2. साखर एक वाटी
  3. ओला नारळ चव दीड वाटी
  4. चार/पाच वेलदोडे
  5.  तूप
   
  कृती 
  -  रताळ्याच्या साली काढा.
  -  त्याचे पातळसर गोल काप करा नंतर काप धुवा. बाजूला ठेवा.
  - मंदाग्नीवर जाड बुडाच्या पातेल्यात थोडे तूप गरम करा. त्यात रताळे काप घाला.
  - झाकण ठेवून शिजत ठेवा.झाकणावर थोडे पाणी ओतून ठेवा म्हणजे आत रताळी मऊसर शिजतात.
  - रताळी शिजली की त्यावर नारळ चव,साखर आणि वेलची पूड टाका.
  -  थोडा वेळ मंदाग्नीवर शिजवा. थोड्या वेळाने भांडे उतरवून ठेवा.
  - हे रताळा स्वीट सर्वांनाच आवडतात.
   
  पुढील स्लाईडवर वाचा...बटाटापूरी
 • Fasting Food Special Recipes
   
  बटाटापूरी
  साहित्य

  1. २ मोठे बटाटे, उकडलेले
  2. १/२ कप साबुदाणा
  3. ७ ते ८ मिरच्या
  4. १/४ कप कोथिंबीर, चिरून
  5. १/२ टिस्पून जिरे
  6. ३ टेस्पून शेंगदाणा कूट
  7. १ टिस्पून जिरेपूड
  8. १ ते २ टेस्पून शिंगाडा पिठ (टीप)
  9. चवीपुरते मिठ
  10. तळण्यासाठी तेल
   
  कृती

  -  १/२ कप साबुदाणा पाण्यात भिजवावा. अधिकचे पाणी काढून टाकावे. नंतर किंचीत पाणी घालावे.
  - साबुदाण्याच्यावर १/२ सेमी येईल इतपत पाण्याची पातळी ठेवावी. साधारण ३-४ तास अशाप्रकारे भिजवून ठेवावे. भांडे वरून झाकावे.
  - मिक्सरमध्ये ७-८ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरे आणि थोडे मिठ घालून बारीक करावे. पाणी घालू नये.
  - जर मिक्सर नसेल तर मिरच्या आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी.
  - शिजवलेले बटाटे किसून घ्यावे. त्यात मिरची-कोथिंबीरीचा ठेचा, शेंगदाणा कूट, भिजवलेले साबुदाणे, जिरेपूड आणि शिंगाडा पिठ घालून निट मळून गोळा बनवावा. चव पाहुन, लागल्यास मिठ घालावे.
  -  मध्यम दिड इंचाचे गोळे करावे. तेल तापत ठेवावे. तेल तापले कि आच मिडीयम हायवर ठेवावी. एक प्लास्टिकचा जाड तुकडा घ्यावा. त्याला तेलाचा हात लावावा. प्रत्येक गोळा त्यावर जाडसर थापावा आणि मध्यभागी बोटाने भोक पाडावे. पातळ थापू नये, नाहीतर तेलात टाकल्यावर पुरी तुटते आणि विरघळते.
  -  पुरी तेलात टाकल्यावर ती झार्‍याने अजिबात पलटू नये. पुरी पलटली ती हमखास तुटते. त्यावेळी झार्‍याने अलगद तेलात बुडवावी म्हणजे वरच्या बाजूलाही छान ब्राऊन रंग येईल. तळलेल्या पुर्‍या चटणीबरोबर सर्व्ह कराव्यात.
   
   
  पुढील स्लाईडवर वाचा...दाण्याची आमटी
 • Fasting Food Special Recipes
  दाण्याची आमटी
  साहित्य 

  1. 1 1/2 कप दाण्याचा कुट
  2. ३ कप पाणी
  3. मीठ चवीप्रमाणे
  4. २ टीस्पून साखर
  5. २-३ आमसुलं  
  6. १/२ टीस्पून जिरे
  7. २ हिरव्या मिरच्या
  8. २ टेबलस्पून कोथिंबीर
  9. ३ टेबलस्पून ओलं खोबरं
  10. २ टेबलस्पून तूप
   
  कृती
  -  दाण्याचा कुट पाण्यात मिक्स करा. त्यात मीठ, साखर, आमसुलं,  ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून उकळुन घ्या.
  - फोडणीच्या कढईत तूप गरम करा. तूप कडकडीत तापले कि मिरची घाला.मिरची पांढरी झाली. कि जिरे घालून आमटीला फोडणी द्या.
  -  दाण्याची आमटी व-याच्या  तांदुळा बरोबर सर्व्ह करा.
   
   
  पुढील स्लाईडवर वाचा...अ‍ॅपल रबडी
   
 • Fasting Food Special Recipes
   
  अ‍ॅपल रबडी
  साहित्य
  1.   गोड जातीची सफरचंदे, लहान असतील तर दोन आणि मोठे असेल तर १
  2.  लिंबाचा रस ४/५ थेंब किंवा चिमूटभर सायट्रीक अ‍ॅसिड
  3.  आवडत असेल तर चिमूटभर दालचिनी पावडर ( किंवा आवडता स्वाद )
  4.  १ टिस्पून बारीक केलेले अगर अगर
  5.  एक कपभरून मिल्क पावडर
  6.  १ टिस्पून साखर
  7. १ टिस्पून साजूक तूप
  कृती
  -  एका पातेल्यात पाव कप पाणी घेऊन त्यात लिंबाचा रस  किंवा सायट्रीक अ‍ॅसिड आणि दालचिनी पूड एकत्र करा.
  -  सफरचंदाचा मधलाच गोलाकार भाग कापून वेगळा करा.
  - मग ते वरील पाण्यातच किसा.
  - आता हे मिश्रण शिजत ठेवा. सतत ढवळत रहा. करकरीत सफरचंदे असतील तर मिश्रण शिजायला वेळ लागेल. पिठूळ असतील तर लगेच शिजतील. शिजवून जॅम करायचा नाही. सगळे मिश्रण छान एकजीव झाले आणि पाणी आटले कि आच बंद करा. सफरचंदाच्या गोडीवर अवलंबून साखर वापरायची आहे कि नाही ते ठरवा.
  - साखर या मिश्रणातच घालून शिजवा.
  - एका जाड बुडाच्या पातेल्यात किंवा कढईत १ टिस्पून साखर टाका आणि मंद आचेवर ठेवा. थोड्याच वेळात साखर वितळेल आणि ती सोनेरी रंगावर जाईल. आणखी थोड्याच वेळात काही भागात तपकिरी होऊ लागेल.
  - तसे होऊ लाहले कि त्यात अर्धा कप पाणी टाका.
  -  त्यात साजूक तूप टाका. पाण्याला छान उकळी आली कि त्यात मिल्क पावडर टाका आणि डावेने भराभर ढवळा. पाणी गरम असल्याने मिल्क पावडर चटकन मिसळने आणि मिश्रणाला आटीव दूधाचा रंग आणि स्वादही येतो.
  - आच बंद करून त्यात सफरचंदाचे मिश्रण टाका आणि गरज वाटली तर हँड मिक्सरने ब्लेंड करा. आणि चमच्या चमच्याने आस्वाद घ्या.
   
   
  पुढीस स्लाईडवर वाचा...उपवासाचे अनारसे

   
 • Fasting Food Special Recipes
  उपवासाचे अनारसे
  साहित्य

  1. जरुरीप्रमाणे वरई तांदूळ
  2. साखर किंवा गूळ
  3. खसखस
  4. तूप
   
  कृती
  - वरई तांदूळ तीन दिवस भिजत ठेवावेत. मग उपसून स्वच्छ कपड्यावर अर्धवट वाळवावे. - नंतर खलबत्त्यात चांगले बारीक कुटून घ्यावेत. यात जेवढे पीठ त्याच्या निमपट साखर किंवा गूळ आणि तुपाचे मोहन घालून पीठ चांगले भिजवून घ्यावे. झाकून ठेवावे.
  - नंतर दुसरे दिवशी नेहमी अनारसे करतो तसे अनारसे थापावेत. त्यावर खसखस लावावी.
  - लालासर रंगावर तळून घ्यावेत. सुंदर दिसतात. आणि लागतातही चविष्ट.
   
  पुढीस स्लाईडवर वाचा...दाण्याची चिक्की
      
 • Fasting Food Special Recipes
   दाण्याची चिक्की
  साहित्य

  1. दाणेकूट एक वाटी
  2. साखर एक वाटी
  3. तूप दोन चमचे
  4. चिमुटभर मीठ
   
  कृती
  - मंद आचेवर पातेले ठेवून त्यात मीठ घाला. परता. नंतर त्यात साखर टाकून परता. साखर जळणार नाही
  - याची दक्षता घा. पाणी घालायचे नसते. साखर विरघळू लागेल त्यावेळी एक चमचा तूप घाला. - दाणेकूट घाला.
  - ढवळून घ्या. पोळपाटाला तुपाचा हलका हात लावून घ्या. दाण्याचे मिश्रण पोळपाटावर घाला. - लाटण्याचे मिश्रण पोळपाटावर सम पातळीवर लाटून घ्या. लगेच त्याच्या वड्या करा.
   

Trending