Home | Health And Lifestyle | Yoga Day | Dont Do These Thinsg For Women Even In Love

गर्लफ्रेंडसाठी चुकूनही करु नका या 7 गोष्टी, आनंदावर पडेल विरजन...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 20, 2017, 12:14 AM IST

प्रेम खुलण्यासाठी दोन्ही बाजुंनी होकार असणे गरजेचे असते. तर ते प्रेम टिकवण्यासाठी दोन लोकांमधील समजदारपणा आवश्यक असतो.

 • Dont Do These Thinsg For Women Even In Love

  प्रेम खुलण्यासाठी दोन्ही बाजुंनी होकार असणे गरजेचे असते. तर ते प्रेम टिकवण्यासाठी दोन लोकांमधील समजदारपणा आवश्यक असतो. परंतु अनेक रिलेशनशिपमध्ये आपण पाहतो की, नात्यात मुले मुलींसाठी काही अश्या गोष्टी करण्यासाठी तयार होतात, ज्या त्यांनी करायला नको. खरेतर तरुण असे दोन कारणांमुळे करतात. एक गोष्ट म्हणजे आपल्या पार्टनरला खुश करण्यासाठी आणि दुसरी म्हणजे त्यांना भीती असते की, असे केले नाही तर आपली पार्टनर आपल्याला सोडुन जाईल. परंतु असे केल्यामुळे मुले आपल्या नात्याला कमकुवत बनवतात. चला तर मग पाहुया मुलांने मुलींसाठी कोणत्या गोष्टी करणे चुकीचे आहे.

  पुढील स्लाईडवर वाचा... चुकूनसुध्दा या गर्लफ्रेंडसाठी या गोष्टी करु नका...

 • Dont Do These Thinsg For Women Even In Love

  1. आपली खरी ओळख हरवणे
  तुमच्या पार्टनरने तुम्हाला तुमच्या चांगल्या आणि वाईट गुणांसोबत पसंत करणे म्हणजे खरे प्रेम असते. परंतु जर तिची इच्छा असेल की, तुम्ही तुमची ओळख विसरुन तिची सावली बनुन रहा तर हे तुम्ही स्विकारु नका. तुमच्या भविष्यासाठी हे हानिकारक आहे. आपले नाते मजबुत बनवुन ठेवण्यासाठी पार्टनरला देणे शिका परंतु आपला वापर होऊ देऊ नका. आपल्या पार्टनरच्या आवडीनुसार वर्तन करा परंतु त्यांच्या आवडीनुसार तुमचे संपुर्ण स्वरुप बदलु नका.

 • Dont Do These Thinsg For Women Even In Love
  2. मित्रांपासुन दुर जाणे
  तुमची गर्लफ्रेंड भेटण्याआधी तुम्हाला तुमचे मित्र आणि नातेवाईकच प्रिय होते. हे नवीन नाते जोडल्यावर तुमच्या मैत्रीवर परिणाम पडू देऊ नका. एक नवीन नाते पुढे नेण्यासाठी फ्रेंडशीप विसरणे हे आनंददायी नसते. जर तुमची गर्लफ्रेंड तुमचे मित्र आणि अन्य नातेवाईकांची किंमत करत नाही तर समजुन घ्या ती या नात्याविषयी नकारात्मक आहे.

  पुढील स्लाईडवर वाचा...
 • Dont Do These Thinsg For Women Even In Love
  3. तुमचे विचार
  जीवन जगण्याची प्रत्येकाची एक वेगळी पध्दत आणि विचार असतो. आपल्या पार्टनरच्या विचारांसोबत आपले विचार मिळवणे आवश्यक आहे. परंतु तुम्ही तिच्या विचारसाठी तुम्ही तुमच्या सिंध्दांना विसरुन जाणे हे योग्य नाही . आपले पुर्ण आयुष्य दुर-याच्या विचारांनुसार जगणे हे खुप अवघड आहे. तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडचे विचार समजुन घ्या परंतु तुमच्या विचारांवर दुर्लक्ष करु नका. जर ती तुमच्या वर प्रेम करत असेल तर तुमच्या विचारांचा आदर करेल.

  पुढील स्लाईडवर वाचा...
 • Dont Do These Thinsg For Women Even In Love
  4. निर्णय घेण्याचा हक्क
  आपल्या गर्लफ्रेंडच्या आनंदासाठी आपली आवड-निवड विसरुन नेहमी त्यांच्याच निर्णयांना सहमती देऊ नका. असेही करु नका की तुमचे निर्णय तिच्यावर थोपा. तिच्याकडून अपेक्षाही करु नका की ती तुमच्या सर्व गोष्टी ऐकेल. नाते टिकवण्यासाठी नात्यात स्पेस खुप महत्त्वाचा असतो.

  पुढील स्लाईडवर वाचा...
 • Dont Do These Thinsg For Women Even In Love
  5. आर्थिक स्वरुपात स्वावलंबी रहा
  तुमची गर्लफ्रेंड आर्थिक स्वरुपात कितीही संपन्न असली तरी, तिच्यासोबत नाते जोडल्यावर आपली स्वावलंब विसरण्याची चुक करु नका. जर तुम्ही दबावात असे करत असाल तर तुम्हाला आत्मसन्माना सोबत कॉम्प्रमाइज करावे लागु शकते.

  पुढील स्लाईडवर वाचा...
 • Dont Do These Thinsg For Women Even In Love
  6. आपला आनंद
  आपल्या आनंदाची चावी कोणा दुस-याच्या हातात देणे योग्य नाही, मग तो तुमचा जोडीदार का असेना. कोणत्याही नात्यात एखाद्यावर जास्त अधिकार गाजवण्याची काहीच गरज नसते. चांगले आणि मजबुत नाते आपसातील सम्मान टिकवतात. तुमचे लहान लहान आनंद तुमच्यासाठी खुप महत्त्वाचे असतात. तुम्हाल तुमच्या फॅमिलीसोबत वीकेंडला फिरायला जाणे आवडते परंतु तुमची गर्लफ्रेंड त्यावर हक्क गाजवते, अश्यात तुम्ही तुमचा आनंद सोडून तुमच्या गर्लफ्रेंडच्या आनंदाचा विचार करता हे चुकीचे आहे. आपला पार्टनर आणि आपला आनंद यामध्ये संतुलन ठेवा. तुम्हाला ज्या गोष्टीत आनंद आहे अश्या गोष्टी करा. पार्टनरचा विचार  मर्यादीत करा.

  पुढील स्लाईडवर वाचा...
 • Dont Do These Thinsg For Women Even In Love

  7. आत्मसन्मान
  अनेक वेळा नात्याच्या सुरुवातीला मुले मुलींची प्रत्येक गोष्ट एकतात. असे ते त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी आणि त्यांचा प्रेमासाठी करतात. अश्या वेळी पुरुष अनेक वेळा आपला आत्मसन्मान विसरुन जातात. सुरुवातीला तुम्ही या लहान-लहान गोष्टींचा विचार करत नाही परंतु नंतर याचा त्रास होतो. नात्यात नेहमी बेस्ट राहा परंतु आपला आत्मसन्मान कमी होऊ देऊ नका.

Trending