Home | Health And Lifestyle | Yoga Day | Jio Launches New Diwali Offer

jio कडून 'धन धना धन'च्या माध्यमातून ग्राहकांना दिवाळी गिफ्ट, 399च्या रिचार्जवर 100% कॅशबॅक

दिव्य मराठी वेब टीम | Update - Oct 12, 2017, 01:17 PM IST

जिओच्या 399 रूपयांच्या रिचार्जवर 100 टक्के कॅशबॅक मिळणार आहे.

 • Jio Launches New Diwali Offer
  गॅजेट डेस्क- मोबाइल नेटवर्क कंपन्यांमध्ये सुरु असलेल्या चढाओढीचा फायदा ग्राहकांना होत आहे. जिओ देखील दिवाळीच्या मुहूर्तावर ग्राहकांना नवीन ऑफर दिली आहे. जिओने 'धन धना धन'च्या माध्यमातून ग्राहकांना 100 टक्के कॅशबॅकची ऑफर दिली आहे. जिओच्या 399 रूपयांच्या रिचार्जवर 100 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. दरम्यान, एअलटेलने नुकताच एक नवा फोन बाजारात आणला आहे.

  # 12 ते 18 ऑक्टोबरदरम्यान घेऊ शकतात ऑफरचा लाभ
  - ही कॅशबॅक सुविधा ग्राहकांना कूपनच्या स्वरूपात मिळणार आहे. कूपनचा वापर रिचार्ज करताना करावा लागेल.
  - ग्राहक या ऑफरचा लाभ 12 ते 18 ऑक्टोबरदरम्यान घेऊ शकतात.
  - महत्त्वाचे म्हणजे या कुपनच लाभ ग्राहकांना 15 नोव्हेंबरनंतरही घेता येईल.
  - याचा अर्थ असा की ज्यांचा डेटापॅक संपला नसेल असे ग्राहकही या ऑफरचा लाभ घेऊ शकतात

  # काय मिळणार 399च्या रिचार्जमध्ये
  - यामध्ये प्रीपेड ग्राहकांना 84GB डेटा प्रतिदिवसाला 1GB प्रमाणे मिळेल. सोबतच फ्री कॉलिंग आणि एसएमएस देखील मिळतील.
  - पोस्टपेड ग्राहकांना देखील हीच ऑफर मिळणार आहे. ही ऑफर फक्त प्राईम मेंबर्ससाठीच आहे. इंटरनेट पॅक अॅक्टिव्ह आहे असे ग्राहकही ऑफरचा लाभ घेऊ शकतात, जुना डेटापॅक संपल्यावर नवा डेटापॅकचा वापर करता येऊ शकेल.

  पुढील स्लाइडवर वाचा...# एका वेळेला एकाच कुपनचा करता येणार वापर

 • Jio Launches New Diwali Offer
  #50-50 रुपयांचे 8 कूपन मिळणार 
  जे जिओ प्राईम ग्राहक 12 ते 18 ऑक्टोबर दरम्यान 399चे रिचार्ज करतील त्यांना 50-50 रुपयांचे आठ कुपन मिळतील. हे एकूण  400 रुपयांची असतील यातून ग्राहक 309 किंवा त्यापेक्षा अधिकचा प्लॅन घेऊ शकतात.

  # एका वेळेला एकाच कुपनचा करता येणार वापर 
  सोबतच जिओने एक अट ग्राहकांना घातली आहे. ती म्हणजे ग्राहक एका रिचार्जवर केवळ एकाच कुपनचा वापर करू शकता जर तुम्ही 309चे रिचार्ज करत असाल तर तुम्हाला 259 रूपये द्यावी लागतील. प्रत्येक रिचार्जच्या वेळी तुम्ही एका कुपन वापरु शकतात.

Trending