आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा: तुमचे व्हॉट्सअॅप साफ करा डोक्याला मिळेल नवी ताकद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या शनिवारी एक खूप मूर्खपणाचा मेसेज व्हॉट्सअॅपवर फिरत होता. असे मेसेज शक्यतो व्हॉट्सअॅपवरच येतात. मेसेज असा होता की, त्यातील दोन माणसे ‘टॉयलेट’वर विचार करत होते. मेसेजच्या शेवटी सांगितले होते की, तुम्हाला वाटते ते टॉयलेट नाही तर हा विषय 'टॉयलेट : एक प्रेम कथा'चा आहे. हा पूर्ण मेसेज वाचल्यावर मला खूप राग आला. मी शक्यतो असे मेसेज वाचत नसतो, मात्र मागे टॉयलेट या विषयावरचा एक खूप सुंदर मेसेज माझ्या वाचण्यात आल्याने मी हा मेसेज पूर्ण वाचला. त्या मेसेजमध्ये एका व्यक्तीने एका स्तंभकाराला प्रश्न विचारला होता. हा स्तंभकार प्रश्नकर्त्यांच्या प्रश्नाला उत्तरे देत असतो. प्रश्नकर्त्याने विचारले होते की, ‘माझ्या लग्नाला काही दिवसच झाले आहेत आणि माझी पत्नी पाश्चिमात्य पद्धतीच्या टॉयलेटची मागणी करत आहे. माझ्या घरात भारतीय पद्धतीचे टॉयलेट आहे. या मुद्द्यावर तिला सोडचिठ्ठी देण्यापर्यंत माझ्या कुटुंबाची मानसिकता गेली आहे. मी काय करू?’ एवढ्या साध्या मुद्द्याची भांडणे थेट सोडचिठ्ठीपर्यंत जातात हे वाचून त्या वेळी मला आश्चर्य वाटले होते. 

या प्रश्नावर स्तंभलेखकाने दिलेले उत्तर खूप सुंदर होते. त्यांनी लिहिले होते, ‘मी तुझ्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही. कारण तू मला ई-मेल केला आहेस. हाच प्रश्न तू मला कबुतराच्या साहाय्याने पाठवला असता तर मी उत्तर दिले असते.’ प्रश्नाचे उत्तर देताच अशा पद्धतीने स्तंभलेखकाने घेतलेल्या फिरकीतच उत्तर होते. प्रश्नकर्त्याला ते मिळालेही. काळ बदलला तसे आपणही बदलायला हवे. जर आपल्या घरी नवीन लग्न करून आलेल्या नवरीला पाश्चिमात्य टॉयलेटची सवय असेल, तर आपण तसा बदल का करू नये? असेच स्तंभलेखकला सुचवायचे होते. आता शनिवारी आलेल्या मेसेजमुळे मात्र मला खूप राग आला. मी त्या ग्रुपमधून बाहेर पडलो. त्या चित्रपटात फक्त दोन सेकंद सामाजिक संदेश देण्यात आला अाहे, आपण मात्र त्यावर हजारो मेसेज तयार करतो. एवढेच काय आपण ते मेसेज वाचून हसतोही. मी ‘एलेनॉर रुझवेल्टता काेट आणि ईपीजे डेटा सायन्स’ नावाच्या मासिकात आलेला एक लेख वाचल्यानंतर असे मेसेज आणि पोस्ट ब्लॉक करण्याचा सपाटाच लावला आहे. मॅनेजमेंट थिंकर एलेनॉर रुझवेल्ट म्हणतात, ‘ज्यांची बुद्धी अतुलनीय आहे तेच कल्पनाशक्ती लढवू शकतात.’ 

ईपीजे डेटा सायन्समध्ये प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टमध्ये सांगितले होते की, जास्त हताश लोकच आपले फोटो प्रसिद्ध करतात. सेल्फीबाबतही हा नियम लागू होतो, असे त्यांचे म्हणणे होते. कदाचित सोशल साइटसाठी हा निष्कर्ष शंभर टक्के लागू पडत नसेल, मात्र तेथील काही लोकांनाही तो लागू पडत होता. या रिपोर्टमध्ये असेही सांगितले होते की, एकलकोंडे लोक इन्स्टाग्रामवर काळ्या किंवा गडध रंगाचे फोटो शेअर करतात. जे लोक नॉर्मल आहेत त्यांचे फोटो साध्या बॅकग्राउंडमधील असतात. मी त्या ग्रुपमधून तत्काळ बाहेर पडतो जे मला विचारता मला अॅड करतात. ज्या ग्रुपमध्ये आयडियाजवर चर्चा केली जात नाही, त्या ग्रुपमध्ये मी थांबत नाही. 

काही दिवसांपूर्वी मी माझ्या मोबाइलचा बॅटरी युज चेक केला तेव्हा मला समजले की, माझ्या मोबाइलची ३३ टक्के बॅटरी व्हॉट्सअॅपच्या मेसेजला उत्तरे देण्यातच खर्च होते. नोटपॅडचा वापरही ४० टक्के होता. मी नोटपॅडवर माझ्या नोट्स आणि ऑब्झर्वेशन लिहीत असतो. जेव्हापासून मी अशा अनावश्यक ग्रुपमधून बाहेर पडलाे आहे तेव्हापासून माझ्या बॅटरीचे आयुष्य वाढले. आता माझ्या व्हॉट्सअॅपसाठी माझ्या बॅटरीचा फक्त नऊ टक्के वापर होतो. याचे दुसरे फायदेही झालेत. आता माझे डोके शांत राहायला लागले आणि आत्मनिरीक्षण आणि नवी विचारांसाठीही मी वेळ देऊ शकतो. 

फंडा असा आहे की : आपल्याव्हॉट्सअॅपमध्ये अनावश्यक काय आहे त्याचा शोध घ्या. त्यामुळे तुमच्या मोबाइलचीच नाही, तर तुमच्या डोक्याची बॅटरीही चमकणार आहे. 
- एन. रघुरामन, मॅनेजमेंटगुरू 
बातम्या आणखी आहेत...