Home | Health And Lifestyle | Yoga Day | new technology to make life comfortable

मानवी जीवन सुसह्य करणार आभासी वास्तव

तनू एस,सॉफ्टवेअरतज्ज्ञ/तंत्र सल्लागार,बंगळुरू | Update - Aug 26, 2017, 03:00 AM IST

आभासी वास्तवाचा विचार गेमिंग व मनोरंजनासंदर्भात होतो. मात्र, संशोधक अद्भुत प्रकल्पांवर काम करत आहेत

 • new technology to make life comfortable
  आभासी वास्तवाचा विचार गेमिंग व मनोरंजनासंदर्भात होतो. मात्र, संशोधक अद्भुत प्रकल्पांवर काम करत आहेत...
  सोशल नेटवर्किंग
  व्ही- टाइम हा सोशल नेटवर्किंग प्रकल्प असून या माध्यमातून मित्रांना भेटण्यासाठी येथे भरपूर वाव आहे. तुम्हाला केवळ निवड करायची आहे. तुमचा अवतारदेखील येथे तुम्हाला डिझाइन करता येतो. चॅटरूम फीचरमध्ये थेट मित्रांशी संपर्क होतो. एखाद्या अनोळखी व्यक्तीशी आेळख करू शकता. सेल्फी फीचर आहे. या सोशल नेटवर्किंगचा वापर सॅमसंग गिअर व्हर्च्युअल रिअॅलिटी वा गुगल कार्डबोर्डवर करता येईल.
  पुढील स्‍लाइडवर इतर तंत्रज्ञानाविषयी...

 • new technology to make life comfortable
  ज्ञानभांडार
  शिक्षणप्रणालीला सुधारणे, बदलणे आणि जगभरात ज्ञान पोहोचवण्यासाठी  व्यापक स्तरावर व्हर्च्युअल रिअॅलिटी उपयुक्त ठरत आहे. इयॉन रिअॅलिटीसारख्या काही कंपन्या अनेक वर्षांपासून यावर काम करत आहेत. परवडण्याजोगे व्हर्च्युअल रिअॅलिटी गिअर्स आल्यानंतर हे स्वप्न पूर्ण होऊ शकते. इयॉन एक्स्पिरियन्स व्हर्च्युअल रिअॅलिटी अशीच एक लर्निंग लायब्ररी आहे. ऑगमेंटेड आणि व्हर्च्युअल रिअॅलिटीद्वारे विद्यार्थ्यांना अनेक विषयांचे ज्ञान मिळू शकते. 
 • new technology to make life comfortable
  वास्तुरचना
  एखादे घर, इमारत किंवा कार्यालयाचे बांधकाम करण्यापूर्वी वॉक थ्रू करून पाहिले तर उत्तम मार्गदर्शन मिळते. आयरिश व्हर्च्युअल रिअॅलिटीसारख्या कंपन्या व्हर्च्युअल रिअॅलिटीच्या मदतीने थ्रीडी मॉडेलिंगला नवे आयाम देत आहेत.  त्यांनी एक सॉफ्टवेअर बनवले आहे. यात थ्रीडी मॉडेलला व्हर्च्युअल रिअॅलिटीचा फिल दिलाय. डिझाइनद्वारे तयार झालेल्या स्पेसमधून फेरफटका मारता येईल.  बांधकामाच्या किमतीत काटकसर करणे आणि क्षमता वाढवण्यासाठी योग्य पर्याय आहे. 
 • new technology to make life comfortable
  शहर  
  व्हर्च्युअल रिअॅलिटीच्या चाहत्यांना वाटते की, वास्तविक जीवनापेक्षा वेगळ्या जगात फेरफटका मारावा. असे शहर असावे, जिथे दगदगीशिवाय फिरता येईल. टाइमफायर मीडियाचा हैपतिया (Hypatia) प्रोजेक्ट या इच्छेची पूर्ती करतो.
  व्हर्च्युअल पुस्तके, स्मार्टफोन, कला किंवा व्हर्च्युअल आऊटडोअर अॅक्टिव्हिटी असे विविध पर्याय अाहेत. व्हर्च्युअल रिअॅलिटी कॉलेज कँपसची निर्मिती लवकरच करण्यात येईल. 

Trending