आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • NPPA Fixes Ceiling Prices Of Knee Implants, Decision Of Capping Effective From Today

गुडघ्यांचे रिप्लेसमेंट आता 70 टक्क्यांनी स्वस्त, 6 महिन्यापुर्वी हार्ट पेशेंट्ला मिळाला होता दिलासा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नी रिप्लेसमेंट सर्जरी(knee replacement surgery) म्हणजेच गुडघा प्रत्यारोपन करणा-या रुग्णांसाठी आनंदाची बातमी आहे. क्रेंद सरकारने नी रिप्लेसमेंट सर्जरीसाठी वापरले जाणारे डिव्हाइचे मॅक्सिमम रेट ठरवले आहेत. सर्जरीमध्ये सर्वात जास्त वापरल्या जाणा-या क्रोमियम कोबाल्ट नी इप्लांटची किंमत 54720 येवढी निश्चित करण्यात आली आहे. यापुर्वी यासाठी 1.5 लाख रुपये द्यावे लागत होते. 15 प्रकारच्या नी इम्प्लांटच्या किंमतीही रिप्लेस करण्यात आलेल्या आहेत. लवकर नवीन किंमती लागू करण्याचे आदेश देण्यात आलेय. फार्मा रेग्युलेटर एनपीपीएने आपल्या वेबसाइटवर ही माहिती दिली आहे. नवीन किंमती लवकरच लागू करण्याचे आदेश देण्यात आलेय. यापुर्वी केंद्र सरकारने हार्ट पेशेंट्ससाठी वापरल्या जाणा-या स्टेंट्सची किंमत 85 टक्के कमी केली होती. सरकारने काय सांगितले...
 
- सरकारी अहवालानुसार प्रत्येक वर्षी जवळपास दिड लाख रुग्ण नी इम्प्लांट करतात. या हिशोबाने पाहिले तर प्रत्येकवर्षी जवळपास 1500 कोटी रुपये सेव्ह केले जाऊ शकतात. म्हणजेच याचा सर्व फायदा हा रुग्णांना होणार आहेत. 
 
- केमिकल अँड फर्टिलाइजर मिनिस्टर अनंतर कुमारने सांगितले की, नी इम्प्लांटवर केलेल्या पुर्ण कॅपिंगचा निर्णय तात्काळ लागू करण्यात येईल.

- यापुर्वी एनपीपीए व्दारे हार्ट सर्जरीमध्ये वापरल्या जाणा-या स्टेंटच्या किंमती कमी करण्यात आल्या होत्या.

- एनपीपीएने स्टेंटच्या किंमती 85 टक्के कमी केल्या होत्या. बेयर मेटल स्टेंटची किंमत 7260 रुपये आणि ड्रग इल्यूटिंग स्टेंटची किंमत 29,600 रुपये केली होती. यापुर्वी याची किंमत 40 हजार आणि 1.98 लाख रुपये होती.
 
आजपर्यंत येवढा चार्ज का होता?
- नी रिप्लेसमेंट सर्जरीसाठी हॉस्पिटल, इंपोर्टर्स आणि डिस्ट्रीब्यूटर मिळून 449% नफा कमावत आहेत अशी माहिती शासनाला मिळाली होती.
- सर्जरीमध्ये वापरल्या जाणा-या इम्प्लांट इंपोर्टर्सला जवळपास 76% फायदा होतो. यासोबतच डिस्ट्रीब्यूटरला 100 टक्क्यांपेक्षा जास्त आणि दूस-या मार्जिनमध्ये जवळपास 102 टक्के फायदा होतो. आणि या सर्वांचा बोजा हा रुग्णांवर येतो. 
15 प्रकारच्या इम्प्लांटच्या किंमती निश्चित
- एनपीपीएनुसार 15 प्रकारच्या नी इम्प्लांटच्या किंमती ठरवल्या आहेत. यामध्ये 12 प्रायमरी नी रिप्लेसमेंट सिस्टम, 3 रि-विजन नी रिप्लेसमेंट सिस्टमचा समावेश आहे. 
मॅन्युफॅक्चरर्स घेऊ शकत नाही जास्त किंमत
- एनपीपीएनुसार कोणतेही मॅन्युफॅक्चरर्स सीलिंग प्राइजपेक्षा जास्त किंमतीने नी इम्प्लांट विकू शकत नाही. असे करताना जर तो आढळला तर ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर 2013 च्या नियमाने त्याला ओव्हरचार्ज केलेली रक्कम व्याजासकट शासनाला द्यावी लागेल.
 
डिस्ट्रीब्यूटर्स आणि हॉस्पिटल्सचे ट्रेड मार्जिन निश्चित
- एनपीपीएनुसार नी इम्प्लांटसाठी किंमत निश्चित झाली आहे. यामध्ये डिस्ट्रीब्यूटर्स/ स्टॉकिस्ट आणि हॉस्पिटल्स/ नर्सिंग होम्स/ क्लीनिक्सच्या ट्रेड मार्जिनचा समावेश आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या इम्प्लांटसाठी यांचे जास्तीत जास्त ट्रेड मार्जिकन 4 ते 16 टक्क्यांच्या जवळपास आहेत. तर येथे रुग्णांच्या माध्यमातून डायरेक्ट हॉस्पिटलपर्यंत इम्प्लांट पोहोचवले जातात. येथे हॉस्पिटल्ससाठी 16 टक्के ट्रेड मार्जिन असेल.

डोमेस्टिक इंडस्ट्रीने केले वेलकम
- असोसिएशन ऑफ इंडियन मेडिकल डिव्हाइस इंडस्ट्रीचे फोरम को-ऑर्डिनेटर राजीव नाथ सांगतात की, यामुळे सामान्य लोकांना फायदा होईल. त्यांना पहिल्याच्या तुलनेत कमी किंमतीत गुडघ्याची सर्जरी करता येईल. त्यांच्यानुसार  डोमेस्टिक इंडस्ट्रीलासुध्दा यामुळे फायदा होईल. 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या 85 टक्के कमी केल्या होत्या हार्ट स्टेंट्सच्या किंमती...
 
बातम्या आणखी आहेत...