Home | Health And Lifestyle | Yoga Day | These Kurta Mistakes Are Making You Look Heavier

कुर्ती परिधान करताना या 5 चुका केल्यास तुम्ही दिसू शकता लठ्ठ!

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 21, 2017, 03:42 PM IST

एथनिक लुकसाठी कुर्ती बेस्ट ऑप्शन असते.तुम्ही ऑफिसपासून ते हँगआउट, फंक्शन्सपर्यंत कुठेही कुर्ती कॅरी करु शकता.

 • These Kurta Mistakes Are Making You Look Heavier
  कुर्ती परिधान करताना काही गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज असते.
  एथनिक लुकसाठी कुर्ती बेस्ट ऑप्शन असते.तुम्ही ऑफिसपासून ते हँगआउट, फंक्शन्सपर्यंत कुठेही कुर्ती कॅरी करु शकता. प्रत्येक तरुणी ती मग लठ्ठ असो वा सडपातळ.. कुणावरही कुर्ती शोभून दिसते. पण कुर्ती परिधान करताना काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे असते. जर तुम्ही कुर्ती परिधान करताना काही गोष्टींकडे दुर्लक्ष केले, तर मग मात्र सुंदर कुर्तीतसुद्धा तुम्ही लठ्ठ दिसू शकता. यासाठी कुर्ती परिधान करतान या चुका टाळाव्यात..

 • These Kurta Mistakes Are Making You Look Heavier
  कुर्तीची लेंथ...
  लेगिंग्ससोबत शॉर्ट कुर्ती...

  कुर्तीसाठी लेगिंग्स हा बेस्ट ऑप्शन असतो. मात्र लेगिंग्ससोबत शॉर्ट कुर्ती शोभून दिसत नाही. यामुळे तुमचे बट्स हेवी दिसू शकतात. त्यामुळे पटियालासोबत तुम्ही शॉर्ट कुर्ती परिधान करायला हवी. तर लेगिंग्ससोबत नॉर्मल लेंथची कुर्ती निवडावी.
 • These Kurta Mistakes Are Making You Look Heavier
  सैल कुर्तीत तुम्ही दिसू शकता लठ्ठ...

  सैल कुर्ती 


  अनेकदा सैल कुर्तीत आपण सडपातळ दिसू असा अनेकींचा समज असतो. पण असे मुळीच नाहीये. सैल कुर्तीत तुम्ही अधिक लठ्ठ दिसू शकता. त्यामुळे आपल्या साइजनुसारच कुर्तीची निवड करा.

 • These Kurta Mistakes Are Making You Look Heavier
  कुर्तीचे फेब्रिक...

  फेब्रिक 


  कुर्ती निवडताना त्याच्या फेब्रिकची योग्य निवड करणे गरजेचे आहे. लाइक्रा आणि जर्सी फेब्रिक्सऐवजी कॉटन फेब्रिकची निवड कधीही योग्य. 

   
 • These Kurta Mistakes Are Making You Look Heavier
  स्लीव्ज तुमचा लूक बिघडवू शकतो...

  स्लीव्ज


  केवळ कुर्तीच नव्हे तर त्याचे स्लीव्जसुद्धा तुमच्या बॉडी टाइपनुसार असणे गरजेचे आहे. जर तुमचे आर्म्स जाड असतील, तर तुम्ही केप स्लीव्जची निवड करु शकता. योग्य फिटिंग अर्थातच ¾ स्लीव्ज तुम्हाला शोभून दिसू शकतील. जर स्लीवलेस कुर्ती तुम्ही परिधान करु इच्छित असाल, तर V-neck कुर्ती कॅरी करा.

   
 • These Kurta Mistakes Are Making You Look Heavier
  कलरची योग्य निवड करा...
  कलर 

  कलर्ससुद्धा तुमच्या कुर्तीचा लूक बिघडवू शकतात. जर तुम्ही लठ्ठ असाल, तर ब्राइट कलर्समध्ये तुम्ही आणखीनच जास्त लठ्ठ दिसू शकता. त्यामुळे असे रंग निवडू नका. जर तुम्हाला ब्राइट कलरच हवा असेल तर त्या कलरमध्ये प्रिंटेड कुर्तीची निवड करा.  
   

Trending