Home | Health And Lifestyle | Yoga Day | women should ask these questions from her boyfriend or husband

मुलीने आपल्या बॉयफ्रेंड किंवा पतीला अवश्य विचारावेत हे प्रश्न...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Oct 03, 2017, 04:24 PM IST

तुम्ही तुमच्या पार्टनरला अनेक दिवसांपासून ओळखता. एकमेकांना ब-याच दिवसांपासून डेट करताय.

 • women should ask these questions from her boyfriend or husband
  तुम्ही तुमच्या पार्टनरला अनेक दिवसांपासून ओळखता. एकमेकांना ब-याच दिवसांपासून डेट करताय. आता तुम्ही एकमेकांना पुर्णपणे ओळखता. परंतु तरीही काही प्रश्न तुम्ही तुमच्या पार्टनरला अवश्य विचारावेत.
  पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणते प्रश्न प्रत्येक गर्लफ्रेंडने आपल्या बॉयफ्रेंडला विचारावेत...
  (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 • women should ask these questions from her boyfriend or husband
  जब वी मेट
  जेव्हा तुम्ही पहिल्यांदा भेटलात तेव्हा त्यांच्या डोक्यात काय सुरु होतं. तुम्हाला पहिल्यांदा पाहून त्यांना काय वाटले. हा पहिल्या भेटीचा किस्सा तुम्ही त्यांच्या तोंडून ऐकावा. यापेक्षा रोमँटिक किस्सा कोणताच नसेल. तुमची पहिली भेट खुपच सामान्य असेल. परंतु मनातून काय वाटते हे सांगताना तुम्हाला खुप छान वाटेल. हे अगदी रोमँटिक असेल.
 • women should ask these questions from her boyfriend or husband
  भविष्याविषयी कोणती गोष्ट जाणुन घ्यायची आहे
  तुम्ही तुमच्या पार्टनरला विचारा की, भविष्याविषयी एखादी गोष्ट तुम्हाला जाणुन घ्यायची आहे का. ते जर हो म्हणाले तर त्यांना विचार की, कोणती गोष्ट जाणुन घ्यायला तुम्हाला आवडेल. याचे उत्तर देताना तुम्हाला त्यांच्या प्रायोरिटी जाणुन घेण्यास मदत मिळेल. 
 • women should ask these questions from her boyfriend or husband
  आयुष्यातील तो क्षण ज्यावेळी त्यांना स्वतःवर गर्व वाटला
  अनेक लोक असे असतात, ज्यांना आपला मोठेपणा दाखवणे आवडत नाही. परंतु याविषयी विचारल्यावर त्यांना तो क्षण नक्की आठवेल. यावेळी तुम्हाला त्यांच्या अनेक गोष्टींविषयी माहिती होईल. काही गोष्टी तुम्हाला त्यांनी सांगितल्या नसतील, ते तुम्हाला सांगतील. हे सांगताना त्यांनाही खुप आनंद होईल.
   

Trending