Home | Health And Lifestyle | Yoga Day | Wrong Breathing : 3 Mistake People Do In Daily Life

99% लोकांना श्‍वास घेण्‍याच्‍या चुकीच्‍या पद्धतीमुळे होतात हे आजार, अशी घ्‍या काळजी

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Nov 30, 2017, 03:03 PM IST

आज तुम्‍हाला श्‍वास घेण्‍याच्‍या त्‍या चुकीच्‍या पद्धतीबद्दल माहिती देणार आहोत ज्‍याबद्दल अनेकांना माहिती नाही. आणि याच

 • Wrong Breathing : 3 Mistake People Do In Daily Life

  हेल्‍थ डेस्‍क- आज तुम्‍हाला श्‍वास घेण्‍याच्‍या त्‍या चुकीच्‍या पद्धतीबद्दल माहिती देणार आहोत ज्‍याबद्दल अनेकांना माहिती नाही. आणि याच कारणामुळे अनेकजण आजारालाही निमंत्रण देतात.


  श्‍वास घेण्‍यावेळी होते ही चूक
  - अनेकांना वाटू शकते की, श्‍वास घेण्‍यामध्‍ये काय चुकीचे असू शकते. मात्र एका रिसर्चनूसार 10 पैकी 9 जण अयोग्‍य पद्धतीने श्‍वास घेतात.
  - अनेक जण छातीमध्‍ये श्‍वास घेतात. या पद्धतीने श्‍वास घेतल्‍यास छातीच्‍या खालच्‍या अवयवांमध्‍ये योग्‍य प्रकारे ऑक्सिजन पोहोचत नाही. यामुळे डिप्रेशनसहीत अनेक आजार होण्‍याचा धोका असतो.


  कशी आहे श्‍वास घेण्‍याची योग्‍य पद्धत
  - फुफ्फुसांद्वारे पोटात श्‍वास घेणे, ही योग्‍य पद्धत आहे. म्‍हणजेच श्‍वास घेताना छातीसोबत पोटही हलले पाहिजे.
  - याच नैसर्गिक पद्धतीने लहान मुलेही श्‍वास घेतात. प्रत्‍येकाने याच पद्धतीने श्‍वास घेतला पाहिजे.


  पोटापासून श्‍वास घेतल्‍याने या आजारापासून होतो बचाव
  - एका सर्वेनूसार पोटात श्‍वास घेणा-या व्‍यक्‍तींना डिप्रेशन, ह्रद्याचे आजार आणि डायबिटीज होण्‍याची कमी शक्‍यता असते. तणावासाठी जबाबदार असलेला कार्टिसोल नावाचा हार्मोनही यामुळे कमी होतो.
  - या हार्मोनमुळे व्‍यक्‍ती नेहमी आनंदात राहतो. यामुळे फुफ्फुसांचा आजार होण्‍याची शक्‍यताही कमी होते.


  पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या...योग्‍य पद्धतीने श्‍वास घेणे का आहे गरजेचे आणि यावर डॉक्‍टरांचे काय म्‍हणणे आहे...

 • Wrong Breathing : 3 Mistake People Do In Daily Life

  योग्‍य पद्धतीने श्‍वास घेणे का आहे गरजेचे? 
  - योग्‍य पद्धतीने श्‍वास घेतल्‍याने आपल्‍या संपूर्ण शरीरात रक्‍ताचे चांगल्‍या पद्धतीने अभिसरण होते. 
  - घरात किंवा ऑफीससारख्‍या ठिकाणी ऑक्सिजनचे प्रमाण कमी असते. मोकळ्या मैदानात हे प्रमाण जास्‍त असते. 
  - अशात आपण अधिकांश वेळ हा घर आणि ऑफीसमध्‍ये घालवत असल्‍यामुळे पोटात योग्‍य पद्धतीने श्‍वास घेऊन शरीराला ऑक्सिजनचा योग्‍य पुरवठा होणे गरजेचे असते. चेस्‍ट ब्रिदींगमध्‍ये असे होत नाही. 
  - पोटात श्‍वास घेतल्‍याने मेंदू, फुफ्पूसांसह सर्व शरीरात ऑक्सिजन योग्‍य प्रमाणात पोहोचतो. 


   

   

   

   

   

   

 • Wrong Breathing : 3 Mistake People Do In Daily Life

  एका तासात 1080 वेळेस अशा पद्धतीने घ्‍या श्‍वास, शरीराला मिळतो जास्‍त ऑक्सिजन 
  - आयुयर्वेदिक तज्ञ अबरार मुलतानी सांगतात की, बॉडी सर्वात चांगला टॉनिक आहे ऑक्सिजन. एक सामान्‍य व्‍यक्‍ती संपूर्ण जीवनात 25टक्‍केच फुफ्पूसांचा वापर करतो. 
  - जर त्‍याने योग्‍य पद्धतीने म्‍हणजेच पोटात श्‍वास घेतला तर फुफ्पूसांचा पूर्ण वापर होईल. 
  - एक व्‍यक्‍ती एका मिनिटात 18 वेळेस श्‍वास घेतो. एका तासात 1080 वेळेस आणि दिवसात 25,920 वेळेस श्‍वास घेतो. 

 • Wrong Breathing : 3 Mistake People Do In Daily Life

  डाव्‍या बाजुला छातीमध्‍ये श्‍वास घेण्‍याची प्रक्रिया आणि उजव्‍या बाजुला फुफ्पूसांद्वारे पोटात श्‍वास घेण्‍याची प्रक्रिया. 

Trending