आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्ताच्या एका थेंबाद्वारे उलगडणार कर्करोगासह अनेक आजार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शरीरातून काढण्यात आलेल्या रक्ताच्या नमुन्यापासून तुमच्या रक्तात किती प्रमाणात कोलेस्ट्रेराॅल आहे, हे डॉक्टरांना समजू शकणार आहे. त्याचबरोबर कोणते व्हिटामिन आणि हार्मोन्स योग्य प्रमाणात आणि कमी आहेत हे समजणार आहे. मात्र, समोर आलेल्या माहितीनुसार हा तर मानवाच्या रक्तात लपलेला वैद्यकीय माहितीचा किरकोळ भाग आहे. संशोधकांना सापडले आहे की, मानवी शरीरातील ५.७ लिटर रक्त आजार ओळखण्याचा योग्य स्राेत आहे.
प्रत्येक थेंबात स्वास्थ्याच्या सद्यस्थितीसह भविष्यातील सूचनांचाही खजाना आहे. नवीन तंत्रज्ञानाने रक्ताची तपासणी अधिक प्रगत केली आहे. डॉक्टर आजाराचे पहिले संकेत देणारे मानव प्लाज्माचा विशेष कंपाउंंड शोधू शकतील. प्लाज्माच सर्व रक्त कोशिकांना एकत्र ठेवतो.
डीएनए मेडिसिन इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. यूजीन चान सांगतात की, रक्तात माहितीचा असा स्राेत आहे की, जो जीनोमपेक्षा दहापट इतकेच नव्हे तर शंभरपट अधिक मजेदार आहे. डॉ. चानची

कंपनी अल्जायमर, कर्करोगापासून स्क्लीरोसिससह सर्व आजार रक्ताच्या एका थेंबाच्या चाचणीतून लावण्याच्या प्रक्रियेचा शोध घेत आहेत. चान यांच्या म्हणण्यानुसार, भविष्यात मेमोग्रामच्या तुलनेत स्तनाच्या कर्करोगाविषयी रक्ताच्या चाचणीतून लवकर माहिती मिळेल आणि आणखी योग्य प्रकारे केली जाईल. अल्जायमरची सुरुवात लवकरच समजू शकेल. जर सध्याचे संशोधन योग्य दिशेने होत असेल तर, ती मेडिकल सायन्सच्या जगात मोठी घटना असेल. ज्या गोष्टींचा उलगडा होण्यासाठी शल्यचिकित्सा किंवा रेडिएशन इमेजिंग (एक्स-रे, सिटी स्कॅन)ची गरज असते, ते

रक्ताच्या चाचणीद्वारे समजू शकतील. त्यामुळे आश्चर्य वाटायला नको की, रक्ताच्या चाचणीवर आधारित निदानाच्या चाचणीचा दर दरवर्षी दहा टक्के वाढून २०१८ पर्यंत १७४४ अब्ज रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

जूनमध्ये ब्रिघम अँड वुमन्स हॉस्पिटलने घोषणा केली होती की, त्यांना रक्ताच्या एका नमुन्यातून प्रत्येक व्हायरल इन्फेक्शनच्या हजारो व्हायरसचा शोध घेण्याचा मार्ग सापडला आहे. इकडे, कर्करोगाबाबत रक्ताचे सुरू असलेले डिकोडिंग अपेक्षा वाढवतात. कर्करोगाच्या गाठींच्या परीक्षणाचे प्रकार साधारण आहेत. संबंधित व्यक्तीच्या शरीरातील
गाठीद्वारे स्तन किंवा त्वचेच्या कर्करोगाचा पत्ता लागतो. मात्र, आजार एवढा वाढतो की, उपचार कठीण होतो. स्टेनफोर्ड विद्यापीठातील संशोधकांनी अल्जायमरचे संकेत देणाऱ्या सहा ब्लड प्रोटिन्सचा शोध लावला आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठामध्येसुद्धा डॉ. लिआना
अपोस्तोलोवा असाच प्रयोग करीत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, रक्त चाचणी मणक्यातून पाणी काढण्याच्या कठीण चाचणीपेक्षा सोपी आहे. त्यात स्कॅनसारखी रेडिएशनची गरज नाही. अल्जायमरबाबत लवकर समजल्यावर रुग्णाला त्यापासून सुटका करण्यासाठी मदत मिळेल. सांध्यांचा आजार, गाठीचा शोध रक्ताच्या नमुन्याद्वारे लावण्याचा प्रयत्न आहे. सॅन फ्रान्सिकोची कंपनी क्रीसेंडो बॉयोसायन्सने गाठींचा तपास रक्ताच्या एक डझन संकेताद्वारे करण्याचा प्रकार शोधला आहे.
संशोधकांच्या मते, तो दिवस दूर नाही, जेव्हा प्रशिक्षकाला खेळाडूच्या डोक्याला लागलेल्या माराबाबत लगेच समजेल. संघाचे डॉक्टर खेळाडूच्या रक्ताच्या
चाचणीद्वारे समजू शकतील की, त्याने खेळले पाहिजे की नाही. अनेक संशोधकांचे म्हणणे आहे की, रुग्णांची योग्य काळजी आणि
प्रभावी उपचार रक्त चाचणी अनिवार्य
बनवतात.

या आजारांची माहिती मिळेल
सुकामेव्याची अॅलर्जी, हृदयविकाराचा धोका, पोटाचे आजार, फुप्फुसाचा कर्करोग, अंडाशयाचा कर्करोग, त्वचेचा कर्करोग, गर्भलिंग निदान, आत्मघाती प्रवृत्ती, शस्त्रक्रियेनंतर मृत्यूचा धोका, पेनक्रियाटिक कर्करोग, अन्नाच्या अॅलर्जीची गंभीरता, स्तनाचा कर्करोग.

सुईशिवाय तपासणी

सुईला घाबरणाऱ्या लोकांसाठी खूशखबर- वैज्ञानिक प्रकाश, लेजर आणि फायबर ऑप्टिक्ससारख्या गोष्टींचा वापर करून रक्ताचे नमुने न घेता शरीरांतर्गत हालचालीची माहिती घेतील.
प्रिन्सटन विद्यापीठाच्या एका गटाने लोकांच्या हातावर लेजर किरणांद्वारे रक्तातील साखरेचे प्रमाण शोधण्याचा प्रकार शोधला आहे.
उपचारांसाठी प्रकाशाचा उपयोग होत आहे. काही भागांवरील गाठींचा उपचार फोटो डायनामिक थेरपीने होत आहे. थेरपीतील औषध प्रकाशाची विशिष्ट वेवलेंथने सक्रिय होते.

रक्त चाचणीसंदर्भातील इतिहास
} 1628 मध्ये वैज्ञानिकांना समजले, हृदयातून शरीरात रक्तप्रवाह होतो.
} 1658 मध्ये डच वैज्ञानिक जैन स्वेमरडॅमने माइक्रोस्कोपमध्ये लाल रक्त कण पाहिले.
} 1818 मध्ये पहिल्यांदा मानवाचे रक्त मानवाला देण्यात आले.
} 1901 मध्ये नोेबेल पुरस्कर्ता कार्ल लँडस्टीनरने तीन प्रकारचे मानवी रक्त नमुने शोधले.
} 1970 मध्ये ब्लड ग्लुकोज मीटरचा शोध लागला.
बातम्या आणखी आहेत...