आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WOMEN MAKEUP TIPS : अ‍ॅक्रिलिक थ्रीडी आर्टची मुलींना भुरळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सणासुदीच्या काळात महिला-मुलींचा सजण्यावर जास्त भर असतो. कपडे, हेअर स्टाइल, फेशिअलबरोबरच नखांकडेदेखील लक्ष दिले जाते. सध्या नखांना सजवण्यासाठी नेलआर्टचा वापर केला जात आहे. यामध्ये नखांवर सुंदर चित्र किंवा नक्षीकाम केले जाते.
नेल आर्टच्या माध्यमातून नखांना वेगवेगळ्या डिझाइन, चमक आणि स्टोन्स लावून सजवले जाते. कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुणींपासून तर वयस्कर महिलांमध्येदेखील नेलआर्ट केल्याने ट्रेंडी लूक येतो. यामध्ये नखांना हिरे, मोती टिकल्या इत्यादीने सजवून पारदर्शी सिलच्या साह्याने सिल केले जाते. त्यामुळे हे नक्षीकाम एक ते दोन महिने सुरक्षित आणि चमकदार राहते.