(छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)
अल्कोहलचे सेवन ब-याच व्यक्तींना वेग-वेगळ्या पद्धतीने प्रभावित करत असते. रोज अल्कोहलचे सेवन करणा-या व्यक्तींना अनेक शाररिक समस्यांना सामोरे जावे लागते. अल्कोहलमुळे अनेक जणांचे जीवन उद्धस्त होऊ शकते.
महिलांमध्ये वाढत आहे अल्कोहोलचे प्रमाण
दिवसेंदिवस महिलांमध्ये अल्कोहोल सेवन करण्याचे प्रमाण वाढत आहे. एका सर्व्हेक्षणातून समोर आले आहे की, अल्कोहल पिणा-या महिलांच्या संख्येत 54 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे समाजासाठी आणि परिवातील सदस्यांसाठी ही चिंतेची गोष्ट झाली आहे.
अल्कोहोलचे सेवन करणा-या महिलांना शाररिक संबधांमध्ये अनेक अडचणींना सामोरे जावे लागण्याची भिती असते. अनेक महिलांना यामुळे नको असलेल्या प्रेग्नेंसीलादेखील सामोरे जाण्याची वेळ येते. महिलांच्या या सवयीचा परिणाम जन्माला येणा-या बाळावर होण्याची दाट शक्यता असते. यामुळे गर्भात बाल मृत्यु होण्याची शक्यता अधिक असते. ब-याच वेळा अल्कोहोलचे सेवन करणा-या महिलांची मुले असामान्य जन्माला येण्याची शक्यता असते.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा, यावरचा उपाय...