आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅन्जिअाेग्राफी, अॅन्जिअाेप्लास्टी अन‌् बायपास...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गैरसमज: Angioplasty/ bypass surgery ही हृदयाच्या blockages ची संपूर्ण चिकित्सा आहे.
cardiac rehab ने हृदयाचा blockages मुळे खंडित झालेला रक्तपुरवठा पुनर्स्थापित करता येत नाही.
समज : हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये blockages मुळे आपल्यास दम लागणे, धाप लागणे, चक्कर येणे असा त्रास व्हायला लागला की, बऱ्याचदा आपल्याला आपले डॉक्टर अॅन्जिअाेग्राफी करण्याचा सल्ला देतात. अॅन्जिअाेग्राफीच्या चाचणीत blockages आढळल्यास रुग्णाची व नातेवाइकांची ओढाताण सुरू होते व ते विविध डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी धावपळ करतात. अशावेळेस बऱ्याचदा कोणीतरी अॅन्जिअाेप्लास्टीचा सल्ला देते तर कोणी bypassचा.
कधी कधी दोन डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यातही तफावत अाढळते. याच्याव्यतिरिक्त काही अनुभवसिद्ध मित्रपरिवार आणि नातेवाइक पार गंडे-दोरे करण्यापासून तर इतर विविध उपचारही सुचवतात. रुग्ण व त्याच्या परिवाराला असणाऱ्या मृत्यूच्या भीतीपोटी रुग्ण एखादा निर्णय
पण घेतो आणि त्या उपचार पद्धतीला सामोरे जातो तो फक्त या आशेने की तो या चिकित्सा पद्धतीने पूर्ण बरा होईल आणि म्हणूनच ही माहिती द्यावीशी वाटली.

Angioplasty/ bypass surgery ही नेमकी कसली चिकित्सा आहे?
अॅन्जिअाेप्लास्टी व bypass surgery या चिकित्सेला revascularisation procedure असे
म्हणण्यात आले आहे. म्हणजेच हृदयात blockages असणाऱ्या वाहिनीमुळे हृदयाच्या ज्या भागाला रक्तपुरवठा कमी किंवा बंद झाला आहे, त्या भागाला सुरळीत रक्तपुरवठा पुनर्स्थापित करण्याची प्रक्रिया.

Angioplasty/ bypass surgery केल्यावर जरी रुग्णाच्या blockages मुळे होणारा हृदयाचा रक्तपुरवठा पुनर्स्थापित केला गेला तरी नवीन blockages होऊ नाही व असणारे blockages वाढू नाही याकरिता blockages निर्माण करणाऱ्या कारणांना आटोक्यात आणणे गरजेचे असते आणि म्हणूनच जबाबदार डॉक्टर हे आपल्या रुग्णाला या प्रक्रिया झाल्यावर नियमित औषधी गोळ्या सेवन करण्याचा व cardiac rehab करण्याचा सल्ला देतात.
जर एखाद्या रुग्णाने Angioplasty/ bypass surgery झाल्यावर आपण पूर्ण बरे झालो आणि आता आपल्याला कुठलेही उपचार करण्याची गरज नाही असे वाटून त्यांने पुढची चिकित्सा केली नाही तर त्याला पुन्हा Angioplasty/ bypass surgery ची गरज भासू शकते. काहीवेळा तर त्या रुग्णाच्या जीवाला पण धोका हाेऊ शकतो.

cardiac rehab ने हृदयाचा blockages मुळे खंडित झालेला रक्तपुरवठा पुनर्स्थापित करता येतो का? हृदयाच्या एखाद्या भागाला रक्तपुरवठा पुनर्स्थापित करण्यासाठी दोन गोष्टी करता येऊ शकतात एक म्हणजे हृदयात असणाऱ्या सूक्ष्म रक्तवाहिन्यांचा वापर करून रक्ताभिसरण पूर्ववत करणे व दुसरे म्हणजे हृदयाच्या स्थानी नव्या रक्तवाहिन्यांची उत्पत्ती या दोघी गोष्टींना मिळून ‘arteriogenesis’ असे म्हणतात.

जेव्हा हृदयाच्या एखाद्या रक्तवाहिनीत अवरोध तयार होतो तेव्हा नैसर्गिकरीत्या रक्तवाहिनीतील रक्तदाब याच्यात फरक पडतो. दबावाचे नियमन करण्यासाठी शरीर हे रक्त सहायक रक्तवाहिन्यांद्वारे पुढे ढकलते, जेव्हा नित्याने असे घडत असते तेव्हा या रक्तवाहिन्या
विकसित होऊन रक्तपुरवठा अखंडित ठेवू शकतात. हे नैसर्गिक बदल घडून आणण्यासाठी शरीराला किमान २ आठवड्यांचा वेळ लागतो.

औषधे घेऊन व cardiac rehab यातील medical nutritional therapy, therapeutic
exercise intervention आपण कृत्रिमरीत्या रक्तवाहिन्यांच्या दबावात अपेक्षित तो फरक अणू शकतो (यालाच dose response असे म्हणतात) व त्यामुळे नवीन सहायक रक्तवाहिन्यांची निर्मिती घडून येते. फक्त हृदयच नव्हे तर इतर रक्तवाहिन्यांमध्ये अवरोधामुळे (पेरिफेरल artery disease) निर्माण होणारी पिडासुद्धा आपल्याला या चिकित्सेने कमी करणे शक्य असते

निष्कर्ष : 1. Angioplasty/ bypass surgery ही हृदयातील blockages मुळे उत्पन्न होणारा अवरोध दूर करून रक्तपुरवठा पुनर्स्थापित करते हे जरी सत्य असले तरी ती हृदयाच्या धमन्यांच्या विकारांची संपूर्ण चिकित्सा नाही.

2. Angioplasty/ bypass surgery नंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधी गोळ्या घेणे हे अनिवार्य आहे.

3. Angioplasty/ bypass surgery नंतर cardiac rehab चिकित्सा केल्याने जीवनमान सुधारते व
पुन्हा Angioplasty/ bypass surgery ची गरज टाळण्यात मदत होते.

4. Angioplasty/ bypass surgery प्रमाणेच काही रुग्णांमध्ये cardiac rehab चिकित्सेने
blockagesमुळे खंडित व बाधित रक्तपुरवठा सहायक रक्तवाहिन्यांच्या मदतीने पुनर्स्थापित करता येऊ शकतो.
बातम्या आणखी आहेत...