आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सफरचंदचे व्हिनेगर रोज सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे, वाचा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सफरचंदचे व्हिनेगर रोज सेवन केल्यास शरीराला अनेक प्रकारचे फायदे होऊ शकतात. हे व्हिनेगर फक्त क्लिनिंग एजंट म्हणूनच नव्हे तर आरोग्य आणि सौंदर्यवर्धकही आहे.
वजन घटवण्यात फायद्याचे
उपाशी पोटी ग्लासभर पाण्यात लहान चम्मचभर सफरचंदाचे व्हिनेगर घेतल्यास सुमारे २०० कॅलरी घटवता येऊ शकते. याद्वारा दरमहा २ ते ३ किलो वजन घटवता येईल.
कसे - यामुळे शरीरातील चयापचय दर वाढतो. अनावश्यक चरबी
कमी करण्यात मदत मिळते. यात एंझाइम आणि जैविक आम्ल असते.

शरीर स्वच्छ ठेवणे
शरीरातील विविध प्रकारचे विषारी घटक सहज कमी होऊ शकत नाही. सफरचंदाचे व्हिनेगर घेतल्याने ते नष्ट होईल.
कसे - यात फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे विषारी घटक शरीरातच नष्ट होतात. सोबतच शौचालाही साफ होते. शौच साफ होणे याचा अर्थ शरीरात पुरेशा प्रमाणात फायबर आहे.

हार्टबर्नसाठी दिलासा
याच्या सेवनाने हार्टबर्नचा त्रासही कमी होतो. ग्लासभर पाण्यात चमचाभर सफरचंदाचे व्हिनेगर सेवन केल्यास लवकरच आराम पडतो.
कसे-शरीरातील अॅसिड नियंत्रणात आणण्याची सफरचंद व्हिनेगरमध्ये क्षमता आहे. यामुळे हार्टबर्नपासून दिलासा मिळतो. मात्र, ज्यांना पोटाच्या अल्सरचा त्रास आहे त्यांनी याचे सेवन करू नये.
बातम्या आणखी आहेत...