आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांना प्रेम हवे, दबाव नकाे!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिता-पुत्र यांच्यातील संघर्ष नवीन नाही. पिढ्यान‌्पिढ्या हे चालत अाले अाहे. परंतु सध्या ते अधिक तीव्र झाले अाहे. कारण दाेन पिढ्यांमधील अंतर खूप वाढले अाहे. अाई-वडील नेहमी मुलांच्या माध्यमातून अापल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अाग्रही असतात; परंतु जसे, जसे मुले माेठी हाेतात तस-तसे त्यांच्यात अापली स्वत:ची अावड-निवड निर्माण हाेते. यामुळे घराघरात एक  नवीनच संघर्ष तयार हाेत असताे.  

नात्या-नात्यांमधील संघर्ष वाढल्यामुळे जनरेशन गॅप तयार हाेताे. प्रसिद्ध लेखक  खलील जिब्रान यांनी अाई-वडिलांना काही सल्ले दिले अाहे. ते म्हणतात, तुमची मुले तुमची नाहीत, ती मुले अाहेत जे जीवन नेहमी साधे बनवू इच्छिता. तुम्ही त्यांचे मालक नाही. तुम्ही त्यांना अापले प्रेम देऊ शकतात, विचार नाही. कारण त्यांचे स्वतंत्र विचार असतात. जर अाई-वडील या भावनेने मुलांना माेठे करतील तर त्यांच्याकडे जीवनाची अाधार अाहेत. त्यांना अत्याधिक अपेक्षांमुळे जीवनात जी निराशा येते त्यापासून वाचवता येईल. 

मुलांवर प्रेम जरूर  करा, परंतु त्यांच्यावर वचक ठेऊ नका. प्रेमाचे साैंदर्यं तेव्हाच ठिकते जेव्हा त्यात काही अंतर असेल. अाई-वडिलांचे प्रेम असे असावे, जसे एका माळीचे  फुलांवर असते. माळी फुलांची पूर्ण निगा राखताे.  फुलांना पाेषक वातावरणही देताे. पण त्याचा हक्क राहत नाही. तसेच अाई-वडील अाणि मुलांचे नाते एखाद्या धनुष्य-बाणाप्रमाणेही असते.  जर तुम्हाला बाण लांब जावा, असे वाटत असेल तर तुम्हाला वाकावे लागले. जसे धनुर्धर धनुष्याची दाेर ताणताे. 
 
अमृत साधना 
ओशो मेडिटेशन रिजाॅर्ट, पुणे