आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य व्यवस्थापन - मधुमेही रुग्णांना हृदयविकार होण्याची शक्यता अधिक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मधुमेहासह रक्तातील शर्करेचे प्रमाण वाढल्यानेही कोरोनरी आर्टरी डिसीज, हार्ट अटॅक आणि हार्ट स्ट्रोकचा धोका वाढतो. तीनपैकी दोन मधुमेही रुग्णांचा मृत्यू हृदयविकार अथवा हृदय बंद पडल्यामुळे होते. मधुमेहाने हृदयाला अनेक प्रकारे धोका संभवतो. यापैकी काही शक्यता पुढे सविस्तरपणे दिल्या आहेत.
हृदयविकाराचा धोका- निरोगी माणसांच्या तुलनेत मधुमेहाच्या रुग्णांमध्ये हृदयविकाराची शक्यता तिपटीने अधिक असते. एवढेच नव्हे, तर मधुमेही रुग्णांमध्ये सायलेंट हार्ट अटॅक जास्त प्रमाणात दिसून येतात. अशा वेळी हृदयविकाराची लक्षणे ओळखणे तसेच वेळेवर उपचार करणे कठीण होते. महिलांना जास्त धोका- महिला मधुमेही रुग्णांमध्ये हृदयविकाराचा धोका जास्त असतो. प्री-मेनॉपॉजल डायबिटिसमुळे फीमेल हार्मोन आणि एचडीएलचे सुरक्षा कवच नष्ट होऊ लागते. स्पष्ट शब्दांत सांगायचे झाल्यास प्री मेनॉपॉजल महिलांमध्ये हार्ट अटॅकची शंका त्या वयोगटातील पुरुषांएवढीच असते. इंटरहार्ट स्टडीनुसार, मधुमेही रुग्णांमध्ये मधुमेही पुरुषांपेक्षा हृदयविकाराचा धोका अधिक असतो. कोरोनरी आर्टरी डिसीजमुळे मधुमेही महिलांमध्ये निरोगी महिलांच्या तुलनेत मृत्यूदर ३ ते ७ पटींनी अधिक असतो.
कोरोनरी आर्टरी डिसीजमुळे निरोगी पुरुषांच्या तुलनेत मधुमेही पुरुषांमध्ये मृत्यूचा धोका २ ते ४ पटींनी अधिक असतो. सामान्यत: यात जोखमीचे ९ घटक असतात. धूम्रपान, जास्त वजन, कमी व्यायाम करणे, फळे आणि भाज्यांचे सेवन कमी असणे आणि तणाव. डॉक्टरांशी चर्चा करून हे रिस्क फॅक्टर कमी करण्याचा प्लॅन करा. हार्वर्ड मेडिकल स्कूल स्टडीनुसार, जीवनशैली थोडी बदलल्यास मधुमेहामुळे हृदयाला होणारे नुकसान कमी करता येते. जास्त वजन असल्यास
मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. सध्या असलेल्या वजनात ७ टक्क्यांची घट केल्यास मधुमेहाचा धोका टाळता येतो. औषधे वेळेवर घ्या. रक्तशर्करा, रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवल्याने फायदा होईल.