आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्भधारणेत समस्या बनू शकते सर्व्हायकल म्यूकस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
होस्टाइल सर्व्हाइकल म्यूकस सुमारे १५ ते २० टक्के महिलांमध्ये आढळतो. हे महिलांच्या नपुसंकतेच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. सामान्य प्रक्रियेत सर्विक्स (गर्भाशय) महिलांमध्ये  ओव्युलेशनच्या अगोदर पानीनुमा म्यूकस निर्माण करताे, जे त्यांच्या सुरक्षेसाठी गरजेचे आहे. सर्व्हायकल म्यूकसचे मुख्य कार्य फेलोपियन ट्यूब (गर्भाशय नळी)मध्ये पोहाेचण्यापर्यंत स्पर्मला सुरक्षित ठेवणे हे आहे. मात्र, बऱ्याच वेळा सर्व्हाइकल म्यूकस चांगल्याच्या तुलनेत जास्त नुकसानकारक ठरते. त्यामुळे ते गर्भधारणा कालावधीत रक्षकऐवजी शत्रू ठरते. अनेकदा यात अॅंटीस्पर्म अॅंटिबाॅडीज असतात, ज्या कारणाने इम्यून सिस्टिम स्पर्मला बाहेरील हल्लेखोर अणू समजण्याची चूक करते. यामुळे ते स्पर्मचा मार्ग अवरुद्ध करतात. शत्रू सर्व्हायकल म्यूकस सेकंडरी इनफर्टिलिटीचे कारण बनू शकतो. म्हणजे, प्रथम गर्भधारणेनंतर गर्भधारणेत अक्षमता येऊ शकते. 

- पौष्टिक आहाराचा अभाव
कोणत्याही महिलेने संतुलित, पौष्टिक आहार- जेवण घ्यावे आणि दररोज आ‌वश्यक तितके पाणी पिणे आवश्यक अाहे. कारण ती हायड्रेट राहावी. सोबतच जर आपण भरपूर दुग्ध उत्पादनांचे सेवन कराल, तर आपला सर्व्हायकल म्यूकस मजबूत होऊ शकताे. 

- ओळखण्यासाठी पोस्टकाॅइटल टेस्ट 
स्पर्म-म्यूकसमधील ताळमेळ समजून घेण्यासाठी पोस्टकाॅइटल टेस्ट हे मुख्य साधन असते. या टेस्टमुळे सर्व्हाइकल म्यूकसची समस्या समजते. विशेषत: जेव्हा इतर टेस्टचे परिणाम सामान्य अाहेत; परंतु तरीही इनफर्टिलिटीचे काही कारण स्पष्ट होत नाहीत तेव्हा. 

- आययूआय हाच उपचार   
सर्व्हाइकल म्यूकसचा एकमेव उपचार इंट्रायुटेरिन इनसेप्शन (आययूआय) प्रक्रियाच अाहे. या उपचारादरम्यान स्पर्मला महिलेच्या युटेरसमध्ये सर्व्हाइकल म्यूकसच्या वर आणि फेलोपियन ट्यूबच्या जवळ ठेवले जाते, ज्यामुळे फर्टिलायझेशनची प्रक्रिया चांगल्या प्रकारे व्हावी.  हा एक परवडणारा आणि कमी वेळेतील उपचार आहे.   
 
डॉ. अलका
आयव्हीएफ एक्स्पर्ट, उदयपूर