आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम बांधणीसाठी योग्य संवादप्रणाली, ऑफिस डिझाइन आवश्यक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीमला प्रोत्साहित करण्यासाठी प्रश्नोत्तर सेशन्स, सातत्याने संवादाची गरज आहे. यासाठी भाषेचाही योग्य वापर आवश्यक आहे. ऑफिसचे डिझाइनही उत्पादकता वाढवण्यासाठी मदत करते. यासंबंधी काही टिप्स हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूमधून...
नेटवर्किंगचा तणाव कमी करण्यासाठी...
प्रत्येक वेळी नेटवर्किंग सहजतेने होईलच याची शाश्वती नसते. सामूहिक संवादाला अधिक यशस्वी व मनोरंजक करण्यासाठी त्यात तुमच्यासारख्या तुल्यबळ व समविचारी लोकांचा समावेश करा. कोणत्याही इव्हेंटला केवळ नेटवर्किंगची संधी या दृष्टीने पाहू नका. तुम्हाला जास्त गर्दी व गोंगाट आवडत नसेल तर स्वत:च इव्हेंट ठरवा. विविध रुची असलेल्या निवडक लोकांना यात सहभागी करून घ्या. तुम्हाला विविध इव्हेंट्समध्ये सातत्याने भेटणा-या लोकांचाच
यात समावेश करा. या इव्हेंटच्या वेळेची निवडही योग्य पद्धतीने करा. तुमच्या कामाच्या वेळा व सुटीच्या वेळांप्रमाणे अनुरूप अशी वेळ ठरवल्यास अधिक प्रतिसाद मिळेल. कोणत्या प्रकारच्या लोकांचे तुम्ही नेटवर्किंग करताहात हे तपासून पाहा. ते तुमचे टार्गेट ऑडियन्स आहेत का? तुम्ही त्यांच्याशी भविष्यात कनेक्ट राहणार का? हे प्रश्न स्वत:ला विचारा.
(स्रोत : नेटवर्किंग फॉर इंट्रोक्टर्स बाय डोरी क्लार्क)
प्रश्नोत्तर सेशन्सला करा अधिक सरस
प्रश्नोत्तर सेशन्सचे आयोजन प्रत्येक व्यवस्थापनात केले जाते. मात्र त्याचे अपेक्षित फलित मिळतेच असे नाही. तुम्ही प्रश्नांना योग्य पद्धतीने हँडल करता का, याची चाचणी करा
- प्रश्नोत्तर सेशन्समध्ये समन्वयक किंवा सेशनचा संचालकही काही प्रश्न उपस्थित करतो. अशा वेळी सहभागी लोकांना उत्तर देण्यासाठी परस्परांशी सल्लामसलत करण्याचे स्वातंत्र्य द्या.
- लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घ्या. केवळ प्रश्न विचारल्याने फायदा होणार नाही. लोकांना त्यांची निरीक्षणे मांडण्यासाठी योग्य वेळ या सेशनमध्ये मिळाला पाहिजे.
- सहभागी सदस्यांचे गट करा. या गटांना चर्चेसाठी वेळ द्या. त्यातून काही महत्त्वाचे प्रश्न समोर येतात.
- समारोप महत्वाची माहिती देऊन करा.
(स्रोत : ४ वेज टू फिक्स द क्वेश्चन-आन्सर सेशन बाय थॉमस वेडेल-वेडेल्सबॉर्ग)
ऑफिसच्या डिझाइनने उत्पादकतेत वाढ
ब-याचशा कंपन्या वर्कस्पेसच्या माध्यमातून टीमला नावीन्यपूर्ण प्रयोग करण्यासाठी प्रोत्साहित करतात. ऑफिसची वर्कस्पेस योग्य असेल तर उत्पादकतेत वाढ होते. कर्मचारी यात समाधानकारकतेने काम करू शकतील.
याची सुरुवात करताना-
- सरळ स्रोताजवळ जा. यात स्रोत म्हणजे कर्मचारी. इंट्रानेट किंवा इतर संवाद साधनांच्या माध्यमातून कर्मचा-यांना थेट प्रश्न विचारा.
- ऑफिसच्या सर्वाधिक प्रिय जागेला वा काॅन्फरन्स रूमला नावीन्य द्या. कॉफी कॉर्नर, कम्युनिटी टेबल व रिलॅक्स रूमलाही अपडेट करणे गरजेचे आहे.
- तंत्रज्ञानाची मदत घ्या. कॉन्फरन्स रूममध्ये वापरण्यात आलेल्या तंत्रज्ञानावरून रूम कधी फ्री होईल हे कळू शकेल. रिझर्व्हेशन व मीटिंग अजेंडा लक्षात ठेवण्यासही तंत्रज्ञानाची मदत घेता येते.
(स्रोत : डिझाइन ऑफिस टू बी मोअर लाइक नेबरहूड बाय मॅक्स शोपोविस्की)
टीमला जोडण्यासाठी फक्त म्हणा- टुगेदर
संघात्मक काम करण्याची भावनाच आपल्याला प्रेरणा देत असल्याचे एका संशोधनात सिद्ध झाले आहे. टीम एकसंध राहिली तर कामही वेगाने व दर्जेदार होते. टीम गोल्समध्ये प्रत्येक व्यक्तीच्या कामाचे मूल्यमापन करता येते. बहुतांश प्रकल्प हे टीमवर्कनेचे पूर्ण होतात. मात्र अनेकदा प्रत्येक व्यक्तीला वाटते की मी एकटीच काम करते वा करतो आहे. काम करताना एकटेच काम करण्याची भावना येत असेल तर म्हणा, ‘टुगेदर’. अर्थात माझ्यासोबत टीमचे सदस्यही काम करताहेत. एका टुगेदर शब्दाने इतरांच्या कामाची जाणीव स्वत:ला करवून देता येते. या भावनेनेच टीम सदस्यातील संघभावना वाढते. टीमप्रमुखाने या शब्दाचे अवधान प्रत्येकाला देणे गरजेचे आहे. त्यामुळे सदस्यांमध्ये एकत्रित असल्याची भावना वाढीला लागते.
(स्रोत : मॅनेजर्स कॅन मोटिव्हेट एम्प्लॉइज विथ वन वर्ड बाय हेडी ग्रांट हॅलवर्सन )