आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑर्गेनिक ड्रेस सर्वोत्तम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोग्याबाबत दक्ष असलेल्या ग्राहकांसाठी ऑर्गेनिक कपडे आकर्षण बनत आहेत. नैसर्गिक फायबरपासून बनवलेले कपडे प्रकृतीसाठी खूप चांगले असतात आणि सिंथेटिक फायबरसारख्या नायलॉन, पॉलिस्टर आदींमुळे टिकाऊदेखील असतात. हे प्राकृतिक फायबर अधिक आरामदायी असते. खाली सहा कारणे देण्यात आलेली आहेत, ज्यामुळे ऑर्गेनिक कपड्यांची निवड केली पाहिजे.

हे स्टायलिश आणि ट्रेंडी आहेत. ऑर्गेनिक फॅशनशी संबंधित डिझायनर्सदेखील वेगळे असतात. ते सामान्य डिझायनर्ससारखे काम करत नाहीत.

ऑर्गेनिक कपड्यांची निवड वातावरणासाठी सुरक्षित आहे. तरीदेखील पृथ्वीवर होणाऱ्या शेतीमध्ये २.५ टक्के फक्त कॉटनचेच उत्पादन हाेते; परंतु ते एक घाणीने भरलेले पीक आहे. सॉइल अॅण्ड ऑर्गेनिक ट्रेड असोसिएशननुसार याच्या उत्पादनात पृथ्वीवरील २५ टक्के कीटकनाशकांचाही वापर होतो.

दुसरीकडे ऑर्गेनिक शेतीमुळे जमिनीला पोषक तत्त्वे मिळण्यासोबतच हे भूमिगत जलपातळीला दूषित करीत नाही. यासोबतच इतर वृक्ष आणि इतर सूक्ष्म जीवजंतूंना जिवंत ठेवण्यासाठी मदत करते. वातावरण बदलण्याने हाेणारे नुकसानही ऑर्गेनिक शेतीच्या माध्यमातून दूर केले जाऊ शकते. यातून कार्बन डाय-ऑक्साइडला जमीन बंद करून टाकते आणि हानिकारक गॅस वातावरणात मिसळण्यापासून रोखते.

तरीदेखील लेदरच्या वस्तू पाहण्यात खूप सुंदर असतात; पण या वस्तू बनवण्यासाठी अनेक प्राण्यांचा जीव घ्यावा लागतो. आमच्या पर्यावरणातील जीव सजीवसृष्टीतील महत्त्वाचा भाग असून, ते वाचवणे महत्त्वाचे आहे. लेदरच्या वस्तू बनवताना या गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे.

ऑर्गेनिक फायबर खरेदी करणे अावश्यक आहे. कारण हे खूपच कमी प्रदूषण निर्माण करते. या कपड्यांंची काळजी घेणे सोपे आहे. हे त्वचेसाठी खूप चांगले आहेत. यासोबतच हे बनवण्यासाठी कुठले केमिकल वा डाय वापरले जात नाही.

ऑर्गेनिक कपड्यांमुळे खाज अथवा अॅलर्जी होत नाही.

सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की, असे कपडे स्वस्त असतात. सिंथेटिक फायबर कपड्यांच्या तुलनेत हे बनवण्यासाठी खर्चही कमी येतो.
अस्मिता अग्रवाल
फॅशन लेखिका, नवी दिल्ली
पुढील स्‍लाइडवर वाचा ऑर्गेनिक ड्रेस बनविण्‍साठी कुठल्‍याही केमिकलचा वापर होत नाही
बातम्या आणखी आहेत...