आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळ्यातील त्रास: जाणून घ्‍या, मूळव्याध म्हणजे नक्की काय? त्‍याचे प्रकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संडासच्या जागी एखादा कोंब लागणे, शौचाहून आल्यावर त्या ठिकाणी अत्यंत वेदना जाणवणे, शौचासोबत रक्तस्त्राव होणे. थोडक्यात ही मूळव्याधीची प्रमुख लक्षणे म्हणण्यास हरकत नाही. शास्त्रीयदृष्ट्या या आजाराचा विचार केल्यास आपल्याला मूळव्याधीचे दोन प्रमुख प्रकार करावे लागतील.
पाइल्स
*शौचाच्या जागी रक्त वाहिन्यांचे जाळे असते. त्यापैकी घडाळ्याच्या काट्याच्या स्थितीप्रमाणे ३, ७ आणि ११ च्या ठिकाणी प्रमुख रक्तवाहिन्या असता.
*बद्धकोष्ठतेमुळे शौचाला कडक झाल्यामुळे वारंवार शौचाला जोर दिल्यामुळे, शौचाला जास्त वेळ बसून राहिल्यामुळे या रक्तवाहिन्यांमध्ये रक्त जमा होऊन या फुगतात आणि याच फुगलेल्या रक्तवाहिन्यांना आपण कोंब किंवा पाइल्स म्हणतो.
*पाइल्सच्या ४ अवस्था असतात आणि अवस्थेनुसार उपचार पद्धतीमध्ये बदल करावा लागतो.
फिशर
*जागरण, उपवास आदी कारणांनी बद्धकोष्ठता झाल्यामुळे कडक शौचाला झाल्यामुळे संडासच्या जागेला जखम होणे किंवा तडा पडणे म्हणजेच फिशर होय. अत्यंत वेदना होणे किंवा शौचाहून आल्यावर आग होणे, जळजळ होणे हे त्या व्याधींचे प्रमुख लक्षण आहे. जखम झाल्यामुळे रक्तस्त्राव देखील कमी अधिक प्रमाणात होऊ शकतो. आजार नवीन असताना त्या ठिकाणी कोंब आलेला नसतो. फक्त वेदना आणि आग हेच प्रमुख लक्षण असते. यालाच अ‍ॅक्युट फिशर म्हणतात.
*कालांतराने वारंवार शौचाला कडक होत राहिल्यास आजार बळावतो व त्या ठिकाणी कोंब निर्माण होतो. जागा संकुचित होते. वेदना आणि आग हे तर असतातच. या अवस्थेला क्रॉनिक फिशर असे म्हणतात.
उपचार पद्धती
-अ‍ॅक्युट फिशरसाठी आम्ही संशोधन करून एक विशिष्ट प्रकारचे तेल (रोपण तेल) व एक गाईच्या तूपामध्ये बनवलेला मलम (रोपण मलम) यांचा उपयोग करतो, जोडीला पोटातून आयुर्वेदिक औषधी, आवश्यकता
भासल्यास वेदनाशामक औषधी व अ‍ॅन्टीबायोटीक्सचा देखील उपयोग करतो.
- या उपचारामुळे आजार पूर्णपणे बरा होऊन रुग्णो योग्यरित्या पथ्य पाळले तर शस्त्रक्रिया टाळता येते.
- क्रॉनिक फिशर यामध्ये शौचाची जागा संकुचित होऊन त्या ठिकाणी कोंब आलेला असतो. हा कोंब क्षारसूत्र पद्दतीने ऑपरेशन करून काढून टाकला जातो व रूग्ण पूर्णपणे बरा होऊन त्याला पुन्हा कोंब निर्माण होत नाही.
- मूळव्याधी व्यतिरिक्त गुदाच्या ठिकाणी भगंदर, रेक्टल पॉलिप, गुदभ्रंश, गुदाचा कर्करोग आदी आजारेदेखील उत्पन्न होतात. प्रत्येक आजाराची योग्य निदान करून चिकित्सा करावी लागते.
रेक्टल पॉलिप (Rectal Polyp)
*शौचाच्या वेळी लहान मुलांच्या गुद्द्वारातून एखादी गाठ बाहेर येते व शौचानंतर ती पुन्हा मध्ये जाते.
*द्राक्षासारखी छोटी असणारी ही गाठ लालजर्द रंगाची असते व तिला धक्का लागल्यास त्यातून रक्तस्त्राव होतो. या गाठीमध्ये वेदना होत नाही. रक्तस्त्राव हेच प्रमुख लक्षणे असते. या गाठीचे दुर्बिणीद्वारे ऑपरेशन करता येते. ऑपरेशननंतर गाठ पुन्हा होत नाही.

गुदभ्रंश (Rectal Prolapse)
*शौचाच्यावेळी कुंथल्यामुळे गुदाचा काही भाग खाली येतो. खाली आलेला भाग आतमध्ये ढकलावा लागतो.
*एकदा गुदाचा भाग आतमध्ये ढकलला की रूग्णाला काही त्रास होत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा या आजाराकडे दुर्लक्ष केले जाते व आजार वाढत जातो. यामध्ये शस्त्रक्रिया करून गुद्द्वाराभोवती एक वायर टाकली टाकली जाते व आजार बरा होतो.

भगंदर (Fistula)
- गुद्द्वाराजवळ एखादी पुटकळी किंवा गाठ निर्माण होते. या गाठीचा संबंध गुद््द्वाराच्या आतमध्ये असतो, या गाठीमधून पू व रक्त मिश्रीत स्त्राव वारंवार होता असतो. या स्त्रावामुळे गुद््द्वाराला खाज येते. वेदना होतात. गोळ्या औषधी घेऊन उपचार
केल्यास काही दिवस पू व पाणी येणे बंद होते. काही दिवसांनी पुन्ही सुरू होते.
- भगंदर या व्याधीमध्ये क्षारसुत्र पद्धतीने उपचार करणे अत्यंत फायदेशीर आहे व संपूर्ण जगामध्ये आज ही एक उत्कृष्ट चिकित्सा पद्धती म्हणून मान्यताप्राप्त आहेत.
प्रमुख लक्षण
*शौचाच्यावेळी रक्तस्त्राव होतो. *वेदना होत नाही. *हाताला कोंब लागत नाही.
*रक्तस्त्राव होतो. * शौचाला बसल्यावर कोंब खाली येतो. परंतु तो नंतर आपोआप मध्ये जातो.
*रक्तस्त्राव असतो/कधीकधी नसतो शौचाला बसल्यावर कोंब खाली येतो व शौचानंतर तो हाताने गुदद््वाराच्यामध्ये ढकलावा लागतो.
*कोंब, मध्ये जात नाही. *रक्तस्त्राव, वेदना, खाज येणे इ. कमी अधिक प्रमाणात असतात.
उपचार
*फक्त औषधी आणि पथ्य *Injection Sclerotherapy
*औषधी * रबर बॅन्ड, Injection Sclerotherapy *यांचा फायदा न झाल्यास क्षारसुत्र पद्धतीने ऑपरेशन
*क्षारसुत्र पद्धतीने ऑपरेश *Suture Haemorrhoidopexy *Stappler
*क्षारसुत्र पद्धतीने ऑपरेशन *Haemorrhoidectomy

गुदाचा कर्करोग
(Rectal Cancer)

*गुदमार्गामध्ये मलाशयामध्ये एक टणक कठीण गाठ निर्माण होते, तिलाच गुदगत कर्करोग म्हणतात.
*गाठ लहान असताना वेदना अजिबात नसतात. फक्त रक्तमिश्रित शौचाला होणे, चिकट स्त्राव होणे अशी लक्षणे असतात. कालांतराने त्यामध्ये वेदना उत्पन्न होते. गुदमार्ग अंकुचित होतो. मलविसर्जनास अडथळा होतो.
* कर्करोगाचे निदान हे लवकर होणे अत्यंत आवश्यक असते. दर्बिणीद्वारे गाठीचा तुकडा होऊन (बायोप्सी), नंतर शस्त्रक्रियेद्वारे आजार बरा होऊ शकतो. अशा प्रकारे वर्ण केलेले निरनिराळे आजार गुदाच्या ठिकाणी उत्पन्न होऊ शकतात. म्हणूनच गुदगत विकारांचे निदान स्वत:च्या मनाने मूळव्याध असे न करता योग्य तज्ज्ञांकडून तपासणी व उपाचर करून घ्यावे लवकर निदान झाल्यास सर्वच आजारांची चिकित्सा ही सुलभ व योग्य रितीने होऊ शकते.