पहिले वृत्त : चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत मारुती सुझुकीची कामगिरी चांगली राहिली. कंपनीच्या नफ्यामध्ये २८.७ टक्के म्हणजेच ८६२.५ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत विक्रीमध्ये १७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आगामी महिन्यांमध्ये ऑटो
मोबाइल कंपन्यांचा नफा वाढतच राहील. कारण देशाच्या रस्त्यांवर कारची संख्या वाढत आहे, सातत्याने नवनवीन मॉडेल लाँच होत आहेत. गाड्यांचे सुटे भाग सहजपणे मिळतात. त्यांची रि-सेल व्हल्यूदेखील चांगली मिळत आहे. तसेच डिझेल-पेट्रोलच्या किमतीही कमी होत चालल्या आहेत.
दुसरे वृत्त : याचवर्षी नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय) ने ११३८ किलोमीटर रस्ता बांधकामाची कंत्राटे दिली आहेत. त्यांना ३७०० किलोमीटर रस्त्यांच्या निर्मितीची कंत्राटे देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी केंद्र सरकारने धोरण आखले आहे. याअंतर्गत कंत्राट देण्याची प्रक्रिया सोपी केली जात आहे. जेणेकरून यासाठी लागणारा वेळ वाचेल. त्यानंतर विदेशी गुंतवणूकदारांनी या क्षेत्रामध्ये रस दाखवला आहे. यामध्ये मलेशियाचा आयजेएम कंस्ट्रक्शन ग्रुप प्रमुख आहे. हा ग्रुप ४४८९ कोटी रुपये खर्चाचा
सोनीपत-पलवल (व्हाया दिल्ली) एक्स्प्रेस-वेची निर्मिती करू शकतो.
तिसरे वृत्त : दिवसेंदिवसप्रवाशांची संख्या कमी होत चालल्यामुळे भारतीय रेल्वे चिंतित आहे. मार्चमध्ये संपणाच्या चालू आर्थिक वर्षात कदाचित पहिल्यांदाच रेल्वे प्रवाशांच्या संख्येत घट येऊ शकते. गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वे प्रवाशांच्या संख्येत दोन ते सात टक्क्यांपर्यंत वाढ होत होती, पण या वर्षाच्या सुरुवातीच्या सहा महिन्यांमध्ये ही वाढ फक्त ०.६ टक्केच राहिली. या सहा महिन्यांमध्ये रेल्वेने आतापर्यंत ४२५.३० प्रवासी तिकीटच आरक्षित केले आहेत. तथापि, गेल्या आर्थिक वर्षातील याच सहा महिन्यांमध्ये रेल्वेने जास्तीची २० लाख तिकिटे आरक्षित केली होती.
विश्लेषण: हानवा ट्रेंड मजेशीर आहे. तो सांगतो की, प्रवासी आता रेल्वेऐवजी वाहतुकीच्या इतर साधनांकडे वळत आहेत. याचे कारण म्हणजे रोड कनेक्टिव्हिटी आता भक्कम होत आहे. रेल्वेचे उच्च श्रेणीचे भाडे आणि विमानाचे टिकीट यामध्ये जास्त फरक राहिला नाही, हे रंजक आहे. कारण हे देशाच्या एकूण आर्थिक प्रगतीचे संकेत आहेत. रेल्वेने २०१३-१४ मध्ये एकूण १,४०,००० कोटी रुपयांची कमाई केली. यापैकी रेल्वेला ३७,५०० कोटी रुपये प्रवासी भाड्यापोटी मिळाले आहेत. जूनमध्ये भाड्यामध्ये १४ टक्क्यांनी वाढ केल्यानंतरही २६,००० कोटींचे नुकसान झाले आहे.
फंडा हा आहे की...
नियमितपणे एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी प्रवास करणार्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. आता ते प्रवासासाठी रस्ते वाहतुकीला अधिक प्राधान्य देत आहेत. साहजिकच याच्याशी संबंधित कोणताही व्यवसाय फायद्याचा सौदा असेल.