आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारंपरिक वस्त्र संग्रहासाठी अभिजात भारतीय कशिदा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतात कलाकार आणि कला याचा खजिना आहे. शिवण, विणकाम, कशिदा यांचे अजोड काम आपल्याकडे होते. रंगांची अक्षरश: उधळण या कामात असते. नजर खिळून राहण्यासारखी कलाकारी भारतात आहे. मॅक्सी ड्रेस वा अनारकली सूटवर बारीक काम केल्यास आकर्षक दिसते.

लेअर्सने यात थोडा आधुनिक लूक देता येईल. हातशिवणीचा हा ड्रेस प्रत्येक समारंभासाठी योग्य ठरतो. यामुळे शाही लूक मिळतोच, पण वेगळेपणही जपता येते. लेस वर्क, लेअर वर्क, कशिदाकारीने कोणत्याही ड्रेसला सुंदर करता येते. कशिद्याचे पूर्ण लांबीचे गाऊन्स इव्हिनिंग पार्टीपासून ते कौटुंबिक समारंभातही वापरता येतात. अभिजात कशिदाकारीचे ड्रेस संग्रही असणे आवश्यक आहे.

>पिवळा, राखाडी व पांढऱ्या शेड्समध्ये लेस लावलेला गाऊन कमालीचा आकर्षक दिसतो. कटवर्कने याच्या सौंदर्यात भर पडते. हा पॅटर्न न्यूट्रल शेडमध्ये वापरता येतो. लेसमुळे याला वेगळा लूक येतो.
(फॅशन लेखिका, नवी दिल्ली)
बातम्या आणखी आहेत...