आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 9 Precautionary Measures To Ensure Safe Holidays At The Mountains With Asthma

अस्थमा असणा-या व्यक्तींनी डोंगरावर जाण्याआधी या 9 गोष्टींवर लक्ष देणे आहे गरजेचे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
सगळीकडे असणा-या प्रदुषणामुळे आज अनेक जणांना अस्थमाचा त्रास होणे सामान्य झाले आहे. पण तुम्हाला अस्थमा आहे आणि तुम्ही हिल स्टेशनवर फिरण्यासाठी जाण्याचा विचार करत असाल तर, तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ज्या व्यक्तींना अस्थमाचा त्रास आहे अशा रूग्णांना डॉक्टरांच्या नियंत्रणाखाली राहून कामे करावी लागतात. हिल स्टेशनवर ऑक्सीजनची कमतरता असल्यामुळे अस्थमाच्या रूग्णांना त्रास होण्याची भिती अधिक असते. आज आम्ही तुम्हाला अस्थमाशी निगडित काही माहिती सांगत आहोत. जर तुम्हाला देखील हिल स्टेशनवर जायचे असेल तर काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

1- आवश्यक टिप्स

ज्या व्यक्तीला अस्थमाचा त्रास आहे त्यांना जास्ती उंचीवरून खाली पाहण्यास सांगितले जात नाही. याचे मुख्य कारण ज्या व्यक्तींना अस्थमाचा त्रास आहे त्यांना जास्ती उंची वरून खाली पाहिल्यास हृदय विकाराचा झटका येण्याचा धोका अधिक असतो. पण, डॉक्टर आणि रिसर्चर्सनुसार, अस्थमाचे रूग्ण पहाडी भागामध्ये फिरयला गेल्यास त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होण्यास मदत होते. पहाडी भागातील वातावरण ड्राय आणि स्वच्छ असल्यामुळे अस्थमा रूग्णांमध्ये सुधारणा होते.
अस्थमाच्या रूग्णांनी ट्रॅव्हल करताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा....