(छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
एखाद्या व्यक्तीच्या अंगात चांगल्या गुणांसोबत वाईट गुणदेखील असतात. या वाईट गुणांचा परिणाम
आपल्या शरिरावर होत असतो. आपल्या शरिराला लागलेल्या चांगल्या सवयी एक वेळेस आपण विसरू शकतो. पण चुकीच्या सवयी आयुष्यभर आपला पिछा सोडत नाही. जर या वाईट सवयी आरोग्याशी संबंधीत असतील तर त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होते आणि एक दिवस ही समस्या गंभीर रूप धारण करते. आज आम्ही तुम्हाला काही चुकीच्या सवयींबद्दल सांगणार आहोत. ज्या सोडल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
1-ओव्हर डायटिंगची सवय सोडा
ब-याच महान व्यक्तींनी म्हंटले आहे की, जगण्यासाठी खा, खाण्यासाठी जगू नका. विशेष म्हणजे ज्यावेळी तुम्ही वजन वाढण्याचे शिकारी झाला असाल त्यावेळी ओवर डायटिंगची सवय तुम्हाला त्रासदायक ठरू शकते. ओव्हर डाइटिंगमध्ये लोक जेवल्यानंतरदेखील इतर पदार्थ खाण्याची त्यांची इच्छा असते. असे केल्याने स्वास्थ्य सबंधी समस्या निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. जर तुम्हाला जंक फूड खाण्याची सवय असेल तर ही समस्या अधिक गंभीर रूप धारण करू शकते.