आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ आरोग्यासाठीच नाही तर सौंदर्यवृध्दीसाठी फायदेशीर आहे दुध...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लहान असताना दूध पिण्याचा खुप कंटाळा येत होता ना... परंतु हेच दूध आता तुमच्या आवडीचे होणार आहे. कारण आम्ही सांगत आहोत दूधाचे ब्यूटी फायदे. दूधाचा उपयोग सौंदर्यासाठी कसा करावा याच्या पध्दतीसुध्दा आम्ही तुम्हाला सांगत आहोत. दुधामध्ये फक्त प्रोटीन आणि कॅल्शियम नसतात तर दूधाचे अनेक ब्यूटी फायदे देखील आहे. चला तर मग पाहुया दूधाचे सौंदर्यवर्धक फायदे कोणते...
नॅचरल क्लीनजर
आपल्या स्किनचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे प्रदुषण आहे. हवेमध्ये असणा-या प्रदुषणामुळे आपल्या स्किन पोर्स बंद होतात. यापासून दूर राहण्याचा एक नॅचरल उपाय आहे. ते म्हणजे क्लीजर म्हणून दुधाचा उपयोग करा. दुध हे नॅचरल क्लिनजर म्हणून काम करते आणि चेह-यावरील प्रदुषण, विषारीतत्त्वे नष्ट करते. जेव्हा तुम्ही कॉलेज, ऑफिस किंवा बाहेरुन घरी याल तेव्हा या नॅचरल क्लिनजरने आपला चेहरा स्वच्छ करा. यामुळे कोणताच साइड इफेक्ट होणार नाही आणि तुमची त्वचा हेल्दी राहील.

पुढील स्लाईडवर वाचा... दुधाचा वापर कोणत्या प्रकारे केल्यास सौंदर्य फायदे होतात...