आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाळ्यात कांदा खाण्याचे आहेत अनेक फायदे, वाचाल तर रोज खाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोग्य ठणठणीत राहावे यासाठी आहारात अनेक जण सलाड घेत असतात. त्यामध्ये उन्हाळा सुरू झाला की भर पडते ती कांद्याची. उन्हाळ्यात कांद्याचे आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे असल्याने डॉक्टर या दिवसांमध्ये कांदा जास्त खाण्याचा सल्ला देतात. उन्हाळ्यात नियमित कांद्याचे सेवन केल्यास डिहायड्रेशन होत नाही, तसेच उन्हामुळे होणारे इतर आजार होण्यापासून देखील रक्षण होते.
कांद्याच्या सेवनामुळे यौन दुर्बलता दूर होण्यास देखील मदत होते. आज आम्ही तुम्हाला कांद्याचे असे काही उपयोग आणि गुणांबद्दल सांगणार आहोत ज्या तुम्ही वापरल्यास अनेक समस्यांचा त्रास कमी करण्यास मदतगार ठरतील.
प्रति 100 ग्रॅम कांद्यात मिळणारी पोषक तत्व -

प्रोटीन 1.2 ग्रॅम कार्बोहायड्रेट 11.1 व्हिटॅमिन 15 मि.ग्रा.
वसा 0.1 ग्रॅम कॅल्शियम 46.9 मिग्रा. व्हिटॅमिन 11 मिग्रा.
खनिज 0.4 ग्रॅम फॉस्फोरस 50 मि.ग्रा. कॅलरी 50 मि.कै.
फायबर 0.6 ग्रॅम लोह 0.7 मि.ग्रा. पानी 86.6 ग्रॅम
1. अपचन दूर करते -
कांद्यात असलेले रेशे पोटाच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. याचे सेवन केल्यने अपचनाची समस्या दूर होते. कच्चा कांद्याचे सेवन केल्याने अपचनाची समस्या कमी होण्यास मदत होते.
2. घशाची खवखव कमी होते -
तुम्ही सर्दी, कफ अथवा घशाच्या खवखवीने पीडित असल्यास कांद्याच्या रसाचे सेवन करा. यामध्ये गुळ अथवा मध एकत्र करून पिणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असते.
पुढे वाचा - कांदा खाण्याचे इतर काही फायदे...