आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेरणा - क्षणोक्षणी प्रोत्साहित करणारे पुस्तकरूपी मित्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपले सर्वात चांगले मित्र असतात ती पुस्तके. कारण जग आणि मानवाच्या व्यवहाराशी परिचय करून देण्याबरोबच आपल्याला योग्य दिशासुद्धा दाखवते. पुस्तके तुमच्या व्यक्तिमत्त्वातही भर घालातात. तर मग जीवनाच्या अनेक वळणावर प्रेरणादायी ठरलेल्या अशाच काही पुस्तकांविषयी जाणून घेऊ या...
शांताराम लेखक:ग्रॅगरी डेव्हिड रॉबर्ट‌्स
ग्रॅगरीरॉबर्ट‌्सने २००३ मध्ये "शांताराम' हे पुस्तक लिहिले होते. त्यांची ही कथा वास्तव जीवनाने प्रेरित होती. हे पुस्तक एका ऑस्ट्रेलियन बँक दरोडेखोर आणि नशा करणाऱ्या व्यक्तीच्या भारतात पळून येणे आणि येथे १० वर्षे घालवण्यावर आधारित आहे. प्रेम, गुन्हे, मैत्री, मानवी मूल्ये आणि जीवनाच्या वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकरणारी ही कादंबरी तुमच्या अनुभव विश्वाचा विस्तार करते.
ईटप्रे लव्ह लेखक:एलिझाबेथ गिलबर्ट
एलिझाबेथगिलबर्टची "ईट प्रे लव्ह'वर आधारित जुलिया रॉबर्ट‌्स अभिनीत चित्रपटदेखील बनलेला आहे. हा चित्रपट एका महिलेवर आधारित असून तिच्या आयुष्यात सर्वकाही आहे, परंतु तरीसुद्धा कमी जाणवते. स्वत:ला शोधण्यासाठी ती एकेदिवशी प्रवासावर जाते. ती भारतामध्येदेखील प्रवास करते.
मार्टिनईडन लेखक:जॅक लंडन
अमेरिकन लेखक जॅक लंडनने १९०९ मध्ये लिहिलेले "मार्टिन ईडन' हे पुस्तक आजही प्रासंगिक आहे. ही एका संघर्षशील लेखकाची कथा आहे. सेल्फ-एज्युकेशनबाबत "मार्टिन ईडन' आपल्याला बरेच काही शिकवते.
ऑलक्विट ऑन वेस्टर्न फ्रंट
लेखक:इरिच मारिया रेमाक्वी
पहिल्या जागतिक युद्धातील एका युवा सैनिकाची ही कादंबरी असून १९२९ मध्ये लिहिली गेली होती. जीवनात येणाऱ्या अडचणींचा धैर्य आणि बुद्धीने सामना करता येतो, हा या कादंबरीचा सार आहे.
नॉर्वेजीयन वूड लेखक:हारुकी मुराकी
हारुकी मुराकीला १९८७ मध्ये प्रकाशित झालेल्या या कादंबरीने सुपरस्टार बनवले. जपानी युवकांमध्ये तो खूप प्रसिद्धही झाला. एका व्यक्तीचा युवा अवस्थेतील भूतकाळ, भावना आणि नुकसान यांची ही कथा आहे.