आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Here Are The Top 10 All Time Favourite Tourist Destinations In India Which ... Agra\'s Taj Mahal

सोन्याच्या दगडांनी सजलेला महल, INDIA मधील ही आहेत पाहण्यासारखी बेस्ट ठिकाणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरात भारत हा एकमेव असा देश आहे जेथे तुम्हाला विविध संस्कृतींचा संगम पाहण्यास मिळेल. ही विविध संकृती पाहण्यासाठी दरवर्षी भारतामध्ये लाखो टूरिस्ट येत असतात. 25 जानेवारीला भारतामध्ये इंडियन टूरिझम डे साजरा केला जातो. आज आम्ही तुम्हाला भारतातील काही खास ठिकाणांबद्दल माहिती सांगणार आहोत. या सर्व ठिकाणांवर देश - विदेशातील पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर पाहण्यास मिळते.

1- म्हैसूर पॅलेस

महाराजा पॅलेस राजमहल म्हैसूरचे कृष्णराजा वाडियार चतुर्थ यांचा आहे. एका घटनेमध्ये या राजमहालाचे मोठ्या प्रमाणात नुकसा झाले होते. यानंतर यास पुन्हा नव्याने बनवण्यात आले आहे. यापूर्वीचा राजमहल हा चंदनाच्या लाकडांपासून बनवण्यात आलेला होता. म्हैसूर पॅलेस म्हणजे द्रविड, पूर्वी आणि रोमन स्थापत्य कलेचा अद्भुत संगम आहे.येथील बुरूज सोन्याच्या दगडांचे बनलेले आहे.
येथे इतर महालांप्रमाणे राजा महाराजांसाठी दीवान-ए-खास आणि सामान्य लोकांसाठी दीवान-ए-आम आहे. येथील अनेक कक्ष आहेत ज्यामध्ये राजामहाराजांचे चित्र आणि हत्यारे ठेवण्यात आले आहेत. यामध्ये राजांचे पोशाख, आभूषण, लाकडावरील नक्षीकाम, मोठे-मोठे दरवाजे पाहण्यास मिळतात. हा महल सकाळी 10 ते दुपारी 4.30 वाजेपर्यंत पाहण्यासाठी खुला असतो. संध्याकाळी या महलावर करण्यात येणारी रोशणाई डोळ्यांचे पारणे फेडणारी असते.
भारतातील इतर फेमस टूरिस्ट ठिकाणांबद्दल जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...