तुम्हाला असे वाटते का, की तुमच्या ब्लड विषयी फक्त रक्तदान करतांनाच माहीती झाली पाहीजे, परंतु हे चुकीचे आहे. संशोधक तुमच्या ब्लडग्रुपच्या जैनेटिक फॅक्टर विषयी सांगतात, जे आरोग्याला प्रभावित करतात. तुम्ही तुमच्या आयुष्यात पाहीले असेल की, एखादा माणुस सहज आपले वजन कमी करतो, तर एखाद्याला वजन कमी करतो येत नाही. परंतु याचे उत्तर तुमच्या ब्लड ग्रुपमध्ये असते. तुमच्या शरीराची अन्ना विषयी प्रतिक्रिया, रोगांविषयी संवेदनशीलता, तनावा विषयी तुमची स्वाभाविक प्रतिक्रिया अशा अनेक गोष्टींविषयी माहीती मिळवण्यासाठी तुम्हाला ब्लड ग्रुप विषयी जाणुन घेणे महत्वाचे असते. चला तर मग जाणुन घेऊया ब्लड ग्रुप विषयी काय माहीती असावे.
1. तुमचा ब्लडग्रुप आजाराची संवेदनशीलता सांगतो
संशोधनात सिध्द झाले आहे की काही ब्लडग्रुपच्या व्यक्तींमध्ये काही विशेष आजारांचा धोका असु शकतो. संशोधनात सिध्द झाले आहे की ओ ब्लड ग्रुप असणा-यांमध्ये हृदय रोगाचा धोका असु शकतो. ए ब्लड ग्रुपमध्ये सूक्ष्म संक्रमणची भीती असते, परंतु या ब्लडग्रुप असणा-या महीलांची प्रजनन क्षमता चांगली असते. एबी आणि ए ब्लडग्रुप असणा-यांना अग्नाशयच्या कँसरचा धोका असतो.