आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tips For Door Choice In Home Interior Read More At Divyamarathi.com

घर सुंदर दिसण्यासाठी दरवाज्यांना द्या असा नवा लूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आकर्षक दरवाजांमुळे घर सुंदर दिसते. सुंदर दरवाजे लक्ष वेधून घेतात. ते तुमचे व्यक्तिमत्त्वही दर्शवतात. त्यासाठी घराचे इंटेरिअर करताना दरवाजांकडे विशेष लक्ष द्यायला हवे.
घरात येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याची नजर सर्वप्रथम दरवाजांवर जाते. त्यामुळे घराचा मुख्य दरवाजा आकर्षक करण्याची परंपरा जुनी आहे. दरवाजे सुंदर दिसण्यासाठी इंटेरिअर डिझायनर्सनी वेगवेगळे प्रयोग केले आहेत. पूर्वी लोक दरवाजांसाठी लाकडांचा उपयोग मोठ्या प्रमाणावर करीत होते, परंतु अलीकडे शासनाने कडक नियम केल्याने इमारतींची लाकडे महाग झाली आहेत. त्यामुळे लोक पर्याय शोधू लागले आहेत.
दरवाजांचे बरेच प्रकार बाजारात विक्रीसाठी आले आहेत. त्यात पीव्हीसी दरवाजे आणि फ्लॅश दरवाजे उपयोगी आहेत. कारण त्यांच्यावर हवी तशी डिझाइन काढता येते. काच आणि आरशावर काढलेल्या डिझाइनचे दरवाजे बाजारात आले आहे. नवीन वर्षात तुम्ही घराचे इंटेरिअर करू इच्छित असाल, तर दरवाजांमध्ये बदल अवश्य करा. त्यामुळे घर अजूनच सुंदर दिसेल.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, घरचे इंटेरिअर करताना कशा प्रकारच्या दरवाजांची निवड करावी...