आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोमॅटो,चिंचेच्या चटनीसोबत संध्याकाळी ट्राय करा गरमा - गरम ब्रोकली भजी...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
थंडीच्या काळात वेग-वेगळ्या प्रकारचे भजे तयार करण्यात येतात. तुम्हालादेखील वेगळे काही ट्राय करायचे असल्यास तुम्ही ब्रॉकली भजे ट्राय करु शकता. हे स्वादिष्ट आहेत आणि पौष्टिकदेखील.
सामग्री:
बेसन दोन कप, तांदूळाचे पिठ दोन मोठे चमचे, लाल मिर्ची पावडर दोन छोटे चमचे, बेकिंग सोडा एक चिमूट, ब्रॉकलीचे तुकडे दोन कप, पाणी अर्धा कप, मीठ स्वादानुसार आणि तेल 1/4 कप, तळण्यासाठी.
असे बनवा -
बेसनमध्ये तांदळाचे पिठ, लाल मिर्ची, बेकिंग सोडा आणि मीठ एकत्र करुन घ्या. हळू-हळू पाणी टाकत चांगली पेस्ट तयार करुन घ्या. पिठ मळतांना गोळे तयार होणार नाही याची काळजी घ्या. आता एका कढईमध्ये तेल गरम करुन घ्या. तेल गरम झाल्यानंतर बेसनची तयार केलेल्या पेस्टमध्ये ब्रॉकलीचे तुकड़े टाकून चांगल्याप्रकारे परतून घ्यावे आणि तेलात डीप फ्राय करुन घ्यावे. भजे बाहेर काढून टिश्यू पेपरवर ठेवल्याने जास्तीचे तेल शोशले जाईल. तुम्ही या गरमा-गरम भज्यांची मजा टोमॅटो सॉस अथवा चिंचेच्या चटनीसोबत घेऊ शकता.