आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chicken Manchurian Indo Chinese Food Invented In Mumbai

चिकन मंचुरीयनचा जन्म मुंबईचा, आता पुण्यासह इतरही शहरांमध्ये विस्तार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या चायनीज फुडचा बोलबाला आहे. कोणत्याही रेस्तरॉंत जा, तुम्हाला चायनीज फुड दिसून येईल. भारतीयांनी अगदी मुक्तहस्ते चायनीज फुड स्वीकारले आहे. पुण्यामुंबईत तर प्रत्येक गल्लीबोळात चायनीजच्या गाड्या दिसतात. शिवाय चायनीजमधील एखादाच पदार्थ लोकप्रिय आहे असेही नाही. यातील सर्वच्या सर्व पदार्थ अस्सल खवय्यांची दांडी गुल करतात. त्यांना आपल्या प्रेमात पाडतात. आता चिकन मंजुरीयनचेच उदाहरण घ्या. तोंडाला पाणी आणणारा हा पदार्थ सर्वाधिक चाखला जातो. पण आता यात आणखी एक सुखद खुलासा झाला आहे. त्याचा जन्मही मुंबईचा आहे. विशेष म्हणजे हा पदार्थ शोधणाऱ्या व्यक्तीचा मुलगा पुण्यासह इतरही शहरांमध्ये या चविचा विस्तार करत आहे.
चिकन मंचुरीयन या डिशचा शोध नेल्सन वांग या व्यक्तीने लावला. मुळचा चीनी असला तरी त्याचा जन्म कोलकत्यात झाला होता. त्यानंतर तो मुंबईत लहानाचा मोठा झाला. 1983 मध्ये त्याने स्वतःचे 'चायना गार्डन' नावाचे रेस्तरॉं मुंबईत सुरु केले. यावेळी काही ग्राहकांनी त्याच्याकडे काही तरी वेगळी, नवीन आणि चविष्ट डिश तयार करण्याचा आग्रह केला.
वांग याने चिकनचे लहान लहान पिस केले. कॉर्न फ्लोरमध्ये तुकडे मिक्स केले. गरम तेलात तळले. त्यात कांदा, हिरव्या मिरच्या, गार्लिक, व्हिनेगर, सोयासॉस या सारख्या भारतीय मसाल्यांपासून तयार केलेल्या सॉसमध्ये सर्व्ह केले. त्यातून चिकन मंचुरीयन ही नवीन डीश तयार झाली.
फ्राईड किंवा गरम भातासोबत त्याने ही नवीन डिश ग्राहकांना वाढली. त्यांनी ती खुप आवडली. आता व्हेजिटेरियन लोकांपर्यंतही ही डीश न्यायची होती. त्यामुळे चिकनच्या जागी कोबी किंवा पनीरचा वापर करण्यात आला.
66 वर्षीय वांग यांचा मुलगा एडवर्ड आता रेस्तरॉं बिझनेस सांभाळतो. त्याने पुणे, गोवा, बंगळुरु, हैदराबाद या शहरांमध्ये फुड चेन सुरु केली आहे.
पुढील स्लाईडवर बघा, नेल्सन वांग यांनी तयार केलेले पहिले चिकन मंचुरीयन....