आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालकांतील स्ट्रोक, त्यावरील उपचार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दीर्घ काळापासून स्ट्रोक हा वयोवृद्धांचा आजार मानला जात आहे. मात्र, नवजात शिशू आणि बालकांमध्येही याचे प्रमाण वाढले आहे. बालकांतील स्ट्रोकची कारणे, लक्षणे वेगळी आहेत. पूर्वोत्तर देशांमध्ये लाखांपैकी पाच बालकांना स्ट्रोकचा आजार आहे. भारतात याबाबत निश्चित आकडेवारी उपलब्ध नाही. चाइल्डहूड स्ट्रोकमध्ये गर्भाच्या २८ व्या आठवड्यांपासून १८ वर्षांपर्यंतच्या बालकांचा समावेश असतो. याची कारणे लक्षणे बालकाच्या वयानुसार बदलत राहतात. मेंदूला योग्य प्रकारे रक्तपुरवठा झाल्यास स्ट्रोक येतो. याचे दोन प्रकार आहेत. एखाद्या अडचणीमुळे रक्तपुरवठा मेंदूूपर्यंत पोहोचणे म्हणजे आयश्मिक स्ट्राेक. तर, मेंदूतील रक्तवाहिन्यांमधून रक्त बाहेर पडत राहणे म्हणजे हेमरेजिक स्ट्रोक होय. बालकांमध्ये दोन प्रकारचे स्ट्रोक सामान्यत: असतात. १. ट्रांझिएंट आयश्मिक अटॅक (टीआयए). जेव्हा मेंदूत जाणारा रक्तपुरवठा काही काळासाठी प्रभावित होतो, तेव्हा टीआयएची शक्यता वाढीस लागते. याची लक्षणे काही मिनिटे किंवा तासांसाठी दृष्टीस पडतात आणि नंतर पूर्णपणे गायबही होतात. प्रौढांत टीआयएमुळे जास्त नुकसान होत नाही. बालकांच्या मेंदूला दुखापत झाल्यास स्ट्रोक येऊ शकतो. बालकांमधील स्ट्रोकचे लक्षण ओळखणे थोडे कठीण असते. बालकांत थकवा, शरीराच्या एका भागात लकवा, चेहरा एका बाजूने झुकणे, बोलण्यात अडचणी, डोकेदुखी, वांती येणे इ. लक्षणे दिसून येतात. बालकांत हृदयरोग किंवा सिकलसेल आजारामुळेही स्ट्रोक येऊ शकतो. शिवाय, इन्फेक्शनचे आजार, डोके किंवा मानेतील ट्रॉमा, हृदयरोग आणि आजार इत्यादी यात सामील असतात. १० % चाइल्डहूड स्ट्रोक प्रकरणांची माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. बालकांत स्ट्रोकसारखी लक्षणे दिसल्यास तत्काळ रुग्णालयात जाऊन एमआरआय करून घ्या. यातून स्ट्रोकचा प्रकार आणि त्यामुळे किती नुकसान झाले हे माहीत होईल. रक्तचाचणी आणि हृदयाचा इको केल्यासही उत्तम. मेंदूतील कोणत्या रक्तवाहिनीत ब्लॉकेज आहे हे अँजियोग्रॅमतून तपासता येईल. स्ट्रोकची कारणे माहीत झाल्यानंतरच डॉक्टर त्यावर उपचार सुरू करू शकतात. ब्लॉकेज याचे कारण असल्यास रक्त पातळ करणारी अॅस्प्रिनसारखी औषधी घेता येऊ शकते. बालक बरे झाल्यानंतर रिहेबिलिटेशन सुरू केले जाते. बालकाच्या मेंदूचा विकास सुुरू असल्याने ते यातून पूर्णपणे बरे होऊ शकते.