चायनिज नूडल्स समोसा -
भारतातील खवय्यांना समोसा मनापासून आवडतो. पण कधी तुम्ही चायनिज नूडल्स स्टफिंग केलेला समोसे टेस्ट केला आहे का? नसेल तर आज आम्ही तुम्हाला चायनिज नूडल्स समोसा कसा तयार करावा याची रेसीपी सांगणार आहोत.
साहित्य :
मैदा - 1 कप
अजवायन (ओवा) - 1/4 छोटा चमचा
मीठ - चवीनुसार
तुप - 2 टेबल स्पून
स्टफिंगसाठी :
नूडल्स - 1 कप (उकडलेले )
मशरूम - 2 छोटे कापलेले
गाजर - बारीक आणि कापलेले
हिरवे मटार - 1/4 कप
मीठ - 1/4 छोटा चमचा
लाल मिर्ची - 1/4 छोटा चमचा अथवा गरजेनुसार
काळी मिर्ची - 1/4 छोटा चमचा
हिरवे धने - 2-3 टेबल स्पून
लिंबाचा रस - 1 छोटा चमचा
सोया सॉस - 1/2 छोटा चमचा
हिरवी मिर्ची - 1 बारीक कापलेली
आले - अर्धा इंच कापून पेस्ट केलेला
'
कृती :
समोसा बनवण्यासाठी लागणा-या पिठासाठी एका भांड्यामध्ये मैदा, क्रश केलेला ओवा, मीठ आणि तुप एकत्र करून घ्या. आता यामध्ये हळू-हळू पाणी टाकून पीठ चांगले मळून घ्या. मळून झाल्यानंतर साधारण अर्धा तास पीठ झाकून ठेवावे.
स्टफिंग तयार करून घ्या :
एका कढाईमध्ये 2 चमचे तेल गरम करुन त्यामध्ये आले आणि हिरवी मिर्ची टाकून तडका द्या. नंतर त्यामध्ये मटार टाकून दोन मिनिटांसाठी तळून घ्या. आता त्यामध्ये कापलेले गाजर टाकून साधारण 1 मिनिटे चांगले तळून घ्यावे. यानंतर त्यात मशरूम, मीठ, लाल मिर्ची, काळी मिर्ची, सोया सॉस आणि लिंबाचा रस टाकून 1 मिनिट हाताने हलवत शिजवून घ्यावे. आता यामध्ये नूडल्स आणि हिरवे धने टाकून चांगले हलवून घ्या. हे झाले तुमचे स्टफिंग तयार.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा, चायनिज नूडल्स समोसा कसा बनवावा याचा व्हिडिओ...