आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: RCB च्या ख्रिस गेलची अशी आहे बिनधास्त लाईफस्टाईल...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंडियन प्रीमियर लीग (IPL) ची धूम देशभर सुरु झाली आहे. शनिवारी झालेल्या एका सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु (RCB) ने गतविजेता कोलकाता नाईटराइडर्सवर तीन विकेटनी विजय मिळवून जोरदार सलामी दिली. ख्रिस गेलच्या एकतर्फी व तुफानी फटकेबाजीमुळे आयपीएल 8 च्या सत्रात पहिला विजय खेचून आणला. घातक फलंदाज अशी ओळख असलेल्या ख्रिस गेलने 56 चेंडूत 96 धावांची खेळी करून संघाला विजयी केले. गेल हा एक हार्ड हिटिंग फलंदाज म्हणून ओळखला जातो.
गेल जेव्हा क्रिकेटच्या मैदानात असतो तेव्हा त्याचा निडरपणा दिसून येतो व त्याचा दराराच विरोधी संघावर भारी ठरतो. ख्रिस गेल ज्या लयीत फलंदाजी व शॉट मारत असतो ते पाहून क्रिकेट रसिकांना डोळ्याचे पारणे फिटते. क्रिकेटमध्ये गेलचा तुफानी अंदाज जसा असतो तसाच तो मैदानाबाहेरही बिनधास्त राहतो. त्याची लाईफस्टाईल रोमांचापेक्षा काही कमी नाही.
बिनधास्त आहे ख्रिस गेल-
क्रिकेटर ख्रिस गेलच्या लाईफस्टाईल रोमांचाने भरलेली आहे. त्याचे इंस्टाग्राम अकाउंट सांगते की, गेल खूपच रोमांटिक आहे. तो बिनधास्तपणे जगणे पसंत करतो. रोमान्स, साहस, डान्स, म्यूझिक, मस्ती हे त्यांच्या जीवनाचा भाग बनले आहे. तो आनंदी जगणे पसंत करतो.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, गेलच्या बिनधास्त लाईफस्टाईलचे काही खास फोटोज...