आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोथिंबीरचे आरोग्यवर्धक फायदे कदाचित तुम्हाला माहीत नसतील...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय आहारात कोथिंबीरचा उपयोग अनेक वर्षांपासुन होत आहे. कोथिंबीर आरोग्यासाठी खुप फायदेशीर असते. यामध्ये प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट, मिनरल असे अनेक पोषकतत्त्वे असतात. याव्यतिरिक्त कोथिंबरीमध्ये कॅल्शियम, फॉस्फोरस, आयरन, केरोटीन, थियामीन, पोटोशियम आणि व्हिटॅमीन आहेत. कोथिंबीर पोटाच्या समस्यांसाठी फायदेशीर आहे. पचनक्रिया सुरळीत ठेवते. आज आपण कोथिंबीरच्या आरोग्यवर्धक गुणांविषयी माहीती मिळवणार आहोत.

पचनशक्ती वाढते
कोथिंबीर पोटाच्या समस्या दूर करते, पाचनशक्ती वाढवते. ताज्या कोथिंबीरच्या पानांना ताकासोबत प्यायल्याने अपचन, मळमळ अशा अनेक समस्यांपासुन आराम मिळतो. कोथिंबीर, हिरवी मिर्ची, नारळ आणि अदरकची चटणी बनवुन खाल्ल्याने, अपचनामुळे पोटात होणा-या वेदनांपासुन आराम मिळतो. याव्यतीरिक्त अर्ध्या ग्लास पाण्यात दोन चमचे कोथिंबीर टाकुन प्यायल्याने पोट दुखीपासुन आराम मिळतो.
कोथिंबीरचे आरोग्यावर्धक फायदे पुढील स्लाईडवर वाचा...